Download App

‘सागर’ला संसदेचा पास देणारे खासदार प्रताप सिम्हा नेमके आहेत कोण?

MP Pratap Simha : संसदेच्या सुरक्षेत आज मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. संसदेच्या कामकाजावेळी (Winter Session) तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली. या तीन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारुन तरुणाने बुटाच्या आतून काहीतरी पदार्थ बाहेर काढले जो फवारल्यानंतर सभागृहात पिवळा धूर पसरला. सभागृहात घूसणाऱ्या व्यक्तीचं कनेक्शन भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांच्याशी लावण्यात आला आहे. तिघांपैकी सागर नामक व्यक्तीच्या पासवर प्रताप सिम्हा (MP Pratap Simha) यांचं नाव असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सागरला संसदेत प्रवेश देणारे खासदार प्रताप सिम्हा आहेत तरी कोणय? याची चर्चा सुरु झाली आहे.

Parliament : देशाच्या संसदेवर ‘गॅस’अ‍ॅटॅक? सभागृहात धुरच धुर करणारा ‘स्मोक बॉम्ब’ म्हणजे काय?

संसदेच्या सभागृहात फवारणी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या चौकशीदरम्यान खासदार प्रताप सिम्हा यांचं पासमध्ये लिहिल्याचं आढळून आलं आहे. प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. प्रताप सिम्हा दुसऱ्यांदा संसदेवर निवडून गेले आहेत.

Sanjay Raut : ‘मोदींनी पकोडे तळायला सांगितलंय ना’.. राऊतांचा अजितदादांना खोचक टोला

कोण आहेत प्रताप सिम्हा?
42 वर्षीय प्रताप सिम्हा कर्नाटकमधील म्हैसूरचे भाजप खासदार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाळ गौडा आहे. प्रताप सिम्हा हे एक पत्रकार असून ते हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रताप सिम्हा कर्नाटक भाजप युवा आघाडीचे अध्यक्षही आहेत.

फेलोशीप घेऊन काय करणार? ‘पीएचडी घेतील ना’; दादांच्या सवालावर सतेज पाटलांचं प्रत्युत्तर

प्रताप सिंहाचा जन्म कर्नाटकातील सकलेशपूर येथे झाला. कर्नाटकातून प्रकाशित होणाऱ्या ‘विजया कर्नाटक’ वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2008 साली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नरेंद्र मोदी

Animal:… असा शूट झाला ‘बॉबी देओल’’चा एण्ट्रीचा सीन? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?

पुढे 2008 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवनावर आधारित ‘नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हादी’ नावाचे चरित्र लिहिले आहे. 2014 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर भाजपसोबत एकनिष्ठतेने काम करीत ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षही बनले. प्रताप सिम्हा यांनी 2014 मध्ये म्हैसूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा 32 हजार मतांच्या फरकाने विजय झाला. तसेच ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यही आहेत.

दरम्यान, आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले असून, खासदार आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags

follow us