Passenger Hits Pilot : दिल्ली-गोवा इंडिगो 6E-2175 फ्लाइटमध्ये (Delhi-Goa Indigo Flight) एक घक्कादायक घटना घडली होती. फ्लाइटच्या उड्डाणाला 10 तास उशीर लागल्याने एका प्रवाशाने पायलटला (Passenger Hits Pilot) कानाखाली मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. साहिल कटारिया असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. परंतु या घटनेला एअरलाइनचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे एका सहप्रवाशाने म्हटले आहे.
सहप्रवासी सोनल विजने एक्सवर (ट्विटर) सांगितले की, मी कोणत्याही हिंसक घटनेचं समर्थन करत नाही पण इंडिगोने या घटनेचा फायदा घेत आपल्या सर्व गैरव्यवस्थापन आणि चुका झाकून टाकण्यासाठी केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्याने पुढे म्हटले की, कोणतीही हिंसा चुकीची आहे पण इंडिगोच्या गैरव्यवस्थापन आणि चुकीच्या कार्यपद्धतीमुळे 186 प्रवासी तासनतास अन्नाविना अडकून पडले होते त्याचं काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
रविवारी (14 जानेवारी) सकाळी 7:40 वाजता दिल्लीहून विमान उड्डाण करणार होते, परंतु संध्याकाळी 5.35 पर्यंत उड्डाण झाले नाही. लहान बाळ, छोटे मुलं आणि वृद्धांसह सुमारे 186 प्रवाशांचे सकाळी 12:20 वाजता (5 तासांच्या विलंबानंतर) बोर्डिंग सुरू झाले, असे विज यांनी सांगितले.
सहप्रवाशाने आरोप केला की, 12:40 पर्यंत बोर्डिंग पूर्ण झाले होते पण 2:50 वाजेपर्यंत फ्लाइटच्या उड्डाणाबद्दल काहीच सांगितले नाही. त्यानंतर ग्राउंड स्टाफने प्रवाशांना सांगितले की एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने ताबडतोब टेक ऑफला परवानगी दिली नाही.
हातकणंगलेत ठाकरे-पाटील ‘शेट्टींसाठी’ आग्राही… पण त्यांनी तर 2019 चा धसका घेतलाय!
परंतु सोनल विज म्हणाले की, दुपारी 1:30 वाजता बोर्डिंग झाल्यानंतर सुमारे एक तासानंतर इंडिगो फ्लाइटच्या पायलटने जाहीर केले की ते क्रू मेंबरची वाट पाहत आहेत, त्यानंतर लवकरच विमानाचे उड्डाण होईल.
ते म्हणाले, हे स्पष्ट होते की ग्राउंड स्टाफ आणि क्रूने चुकीची माहिती दिली. क्रू मेंबर्स बेजबाबदार पद्धतीने ग्राउंड कर्मचार्यांशी संभाषण करत होते. वृद्ध प्रवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक विनंत्या केल्या पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मदत करण्याऐवजी एकमेकांच संभाषण करण्यात ते व्यस्त होते, असे त्यांनी एक्स वर लिहिले आहे.
मतदारसंघात 300 कार्यकर्ते अन् वेळापत्रक; एनडीएच्या उमेदवारांसाठीचा खास प्लॅन तावडेंनी सांगितला
ते पुढे म्हणाले की, अनेक तास विमानात बंदिस्त राहिल्यानंतर दुपारी 4 नंतर प्रवाशांना अन्न पुरविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाची चौकशी करून असे गैरव्यवस्थापन पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला नको का? असा सवाल करत सोनल विज यांनी या घटनेनंतर इंडिगोने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये प्रवासी इंडिगो क्रूला विलंबाबाबत प्रश्न विचारत आहेत.
.@DGCAIndia @MoCA_GoI @JM_Scindia @IndiGo6E I don't support violence, but the airline took advantage and hid all their mismanagement and mistakes in lieu of what the passenger did. Below is a first-hand account of the incident. #DelhiAirport #Indigoairlines #Indigo pic.twitter.com/tNQBKQKwSi
— Sanal vij (@sonalchinioti) January 15, 2024