नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अंतरीम जामीन मंजूर केला. त्यामुळं आसाम पोलिसांना (Assam Police) दणका बसला आहे. खेरा यांना ताब्यात घेतल्यानंतर आसामला नेण्यासाठी आसाम पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
मात्र, काँग्रेसनं तातडीनं हालचाली करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानंही तातडीनं सुनावणी घेत खेरा यांना दिलासा दिला. काँग्रेस पक्षाचे उद्यापासून रायपूर येथे अधिवेशन होते. त्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील सर्व नेते मंडळी विमानाने रायपूरला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी दिल्ली पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले होते.
येदियुरप्पा यांनी घेतला राजकीय संन्यास, निरोपाच्या भाषणात म्हणाले, पुन्हा BJP सत्ता येणार
काँग्रेसचे नेते इंडिगो (6E-204) विमानातून रायपूरला चालले होते. यावेळी दिल्ली पोलिसांना त्यांना विमानातून उतरवले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने ते प्रवास करु शकत नाही, असे पोलिासांनी त्यांना सांगितले. आसाम पोलिसांच्या शिफारसीनंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावर भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसचे नेते विमानतळावरच आंदोलन करत बसले आहेत. त्यांनी या कृत्याला सरकारची तानाशाही असे म्हटले आहे. आमच्या रायपूरच्या अधिवेशनात बाधा निर्माण व्हावी, यासाठी ही अटक केल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.