येदियुरप्पा यांनी घेतला राजकीय संन्यास, निरोपाच्या भाषणात म्हणाले, पुन्हा BJP सत्ता येणार

  • Written By: Published:
येदियुरप्पा यांनी घेतला राजकीय संन्यास, निरोपाच्या भाषणात म्हणाले, पुन्हा BJP सत्ता येणार

बंगळूर : चार वेळा मुख्यमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा (Yediyurappa) यांनी राजकीय संन्यास (political renunciation) घेतला आहे. कर्नाटक (Karnataka Assembly Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदियुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. दरम्यान, आता त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण, लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय भाजपला दुसरा पर्याय नाही. कर्नाटकात त्यांनी भाजपला चांगले दिवस आणले होते.

येदियुरप्पा यांनी शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा येथून पुरासभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. या जागेवरून ते 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर त्यांनी सलग 8 वेळा येथून विजय मिळवला. गेल्या वर्षी जुलैमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही आणि शिकारीपुरा ही विधानसभा जागा सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, आता त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली आहे. बुधवारी विधानसभेत ते निरोपाचे भाषण करताना म्हणाले की, हे माझे निरोपाचे भाषण आहे. हा एक दुर्मिळ क्षण आहे. कारण आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींचे आभारही मानले. ते म्हणाले की, देवाने जर मला शक्ती दिल्यास मी 5 वर्षांनंतर होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सर्वोतेपरी प्रयत्न करेन. मी आधीच सांगितले आहे की, आता मी निवडणूक लढवणार नाही, पण पंतप्रधान मोदी आणि पक्षाने मला दिलेला सन्मान आणि पद मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असं त्यांनी सांगितले.

निरोपाच्या भाषणात येदियुरप्पा नेमकं काय म्हणाले?
1. मला CM पदावरून हटवले नाही, मी स्वतःहून बाजूल झालो
विधानसभेच्या सभागृहात भाषण करताना येदियुरप्पा म्हणाले की, विरोधक म्हणतात की, मला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. पण हे चुकीचे आहे. येदियुरप्पा यांना कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते. मी वयोमानानुसार बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता.
खरं तर, जुलै 2021 मध्ये येदियुरप्पा यांनी पक्षाच्या हायकमांडच्या आदेशानुसार मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. येदियुरप्पा यांच्या पक्षाच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भुजबळांमधील शिवसैनिक आजही जागा; शिंदे गटाला सांगितली ‘हिंदुत्वा’ची व्याख्या

2. निवडणूक लढवणारी नाही, म्हणजे घरी बसणार असा नाही
कर्नाटक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी भाषण करण्याची विनंती सभापती आणि आमदारांनी त्यांना केली. विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले. यावर येदियुरप्पा म्हणाले की, निवडणूक न लढवण्याचा अर्थ असा नाही की मी घरी बसणार. विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्याचा दौरा करून पक्ष आणि अन्य उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पक्ष मोठा आणि मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

3. काँग्रेसला विरोधी पक्षातच बसावे लागणार, हेच अंतिम सत्य
काही गोष्टी बोलून येदियुरप्पांना गप्प बसवले जाईल, असे कोणाला वाटत असेल तर तसे मुळीच होणार नाही. मी भाजपच्या सर्व आमदारांना सांगू इच्छितो की, येत्या निवडणुकीतही आपलीच सत्ता येईल. आपल्याला पूर्ण बहुमत मिळणार आहे, ही गोष्ट चंद्र-सूर्याइतकीच सत्य आहे. काँग्रेसला विरोधी पक्षातच बसावे लागणार हेही अगदी अंतिम सत्य आहे. याबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका आणि मी काही भाकीत केले आहे, असे मुळीच समजू नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube