Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित न राहिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून दोन्ही नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर आता या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार पवन खेडा (Pawan Khera) यांनी काही लोकांना प्रत्येक गोष्टीत अपमानच दिसतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, त्यांनाच आता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिले नाही, यावरून अपमान वाटत आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना पवन खेडा यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे ‘वंदे मातरम’ दरम्यान काही व्यत्यय आला होता का, असे विचारले असता खेडा म्हणाले की, ऑक्टोबर 1937 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, महात्मा गांधींसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या (Congress) कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गायले जावे, असा निर्णय घेतला होता.
LIVE: Independence Day Flag Hoisting | Congress President Shri @kharge | AICC HQ, New Delhi https://t.co/dcTfDyqhFa
— Congress (@INCIndia) August 15, 2026
2024 मधील वाद काय?
2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) कार्यक्रमात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बसण्याच्या व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात त्यांना पाचव्या रांगेत बसवण्यात आले होते. काँग्रेसने यावर तीव्र टीका केली होती आणि सरकारने विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, 2025 मध्येही राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. राहुल गांधी यांना 2026 च्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळाले होते. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, त्यांची बसण्याची व्यवस्था ‘प्राधान्यक्रमानुसार’ (Table of Precedence) केली जाईल.
#WATCH | Delhi | On the absence of LoP Rahul Gandhi and Congress President Mallikarjun Kharge from Independence Day celebrations, Congress leader Pawan Khera says, “They see an insult in everything. Those who did not participate in the fight for freedom or the freedom movement… pic.twitter.com/Bstk3L9VGZ
— ANI (@ANI) August 15, 2026
तर दुसरीकडे काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे इतर अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
