Download App

Period Leave : या भारतीय कंपनीत महिलांना मिळणार दोन दिवस सुट्टी

भारतीय शॉर्ट व्हिडिओ अॅप चिंगारीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. चिंगारी अॅपने 6 मार्च रोजी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा 2 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीने सांगितले की, नवीन धोरण हे तात्काळ लागू होईल. आता महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला दोन अतिरिक्त सुट्या मिळणार आहेत.

तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल

मासिक पाळीदरम्यान महिलांना येणाऱ्या अडचणी ओळखून आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी कंपनी पावले उचलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आता कंपनीच्या प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला महिन्याला 2 पगारी रजा मिळणार आहेत. भारतीय सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, हा मासिक पाळीशी संबंधित दीर्घ काळातील कलंक सोडवण्याचा देखील एक प्रयत्न आहे.

‘या’ मराठी चित्रपटांना मिळणार अनुदान, सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते वाटप

चिंगारीचे सहसंस्थापक व सीईओ सुमित घोष यांनी या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कामाच्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व समजतो आणि सर्वसमावेशक आणि सहाय्यक कामाचे वातावरण तयार करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. “आम्ही भारतभरातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध आहोत ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत होईल,” असे घोष म्हणाले आहेत.

Tags

follow us