Farmer Protest : दिल्लीत शेतकऱ्यांचे (Farmer Protest) सुरु असलेले आंदोलन आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले आहे. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यापासून रोखू नये, असे याचिकेत म्हटले आहे.
द शीख चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक ऍग्नोस्टोस थिओस यांनी ही याचिका दाखल केली. पोलिसांनी रस्त्यावर निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांनी हा अडथळा दूर करावा, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून जखमी व मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Rahul Gandhi यांच्या व्यसनी तरुणावरच्या टिप्पणीवर भडकले पंतप्रधान !
शेतकऱ्यांनी एमएसपीवर हमीभावाची मागणी केली
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकरी एमएसपीच्या हमीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. एमएसपीवर कायदा करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. पंजाबचे शेतकरी गेल्या दोन आठवड्यांपासून हरियाणाच्या सीमेवर थांबले आहेत, परंतु त्यांना पुढे जाऊ दिले जात नाही असा त्यांचा आरोप आहे. पोलिस शेतकऱ्यांवर लाठीमार करत असून त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करत असल्याचा आरोप आहे.
पेटीएमला मोठा झटका! वॉलेट खाते इतर बँकांमध्ये शिफ्ट करण्याची शेवटची संधी
केंद्राबरोबरच्या चर्चेच्या चार फेऱ्या अनिर्णित
एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चार चर्चेच्या फेऱ्या फेल ठरल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांनी चंदीगडमध्ये मोठी चर्चा केली, परंतु कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांशी पाच वर्षांचा करार करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी अध्यादेश आणण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.मात्र, शेतकऱ्यांनी तो आधीच धुडकावून लावला आहे. स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या C2+50% पेक्षा कमी काहीही स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार