राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार

राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का, रांचीत खटला चालवला जाणार

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातील खटला रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात सुरू राहणार आहे.

अमित शहांना हत्यारा म्हटले होते
8 मे 2018 रोजी कर्नाटक निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यावर भाष्य केले होते. याच प्रकरणी विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

हत्येचा आरोपी भाजपमध्ये अध्यक्ष होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. या प्रकरणी राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

याप्रकरणी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी याचिकाकर्ते नवीन झा यांनी रांची दिवाणी न्यायालयात तक्रार केली होती. यानंतर राहुल गांधींना समन्स बजावण्यात आले. राहुल गांधींवर झारखंडमध्ये तीन खटले प्रलंबित आहेत.

एक प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे आहे, जेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की सगळे मोदी चोर आहेत. या प्रकरणी राहुल गांधींच्या वतीने झारखंड कोर्टात केस रद्द करणारी याचिकाही दाखल करण्यात आली होती परंतु ती फेटाळण्यात आली होती.

PM मोदींचा मास्टरस्ट्रोक! भाजपने साधले महाराष्ट्र, UP अन् कर्नाटकमधील लोकसभेच्या 100 जागांचे गणित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज