Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

Manoj jarange आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? स्पष्टीकरण मागत हायकोर्टाचा सवाल

Manoj jarange : राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर समाधानी नसल्याने मनोज जरांगे ( Manoj jarange ) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्या 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवत सवाल केला आहे. आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? असा सवाल कोर्टाने केला आहे.

काकस्पर्श ते ही अनोखी गाठ मांजरेकरांनी सांगितली नाते संबंधांवरील चित्रपटांमागची खास स्ट्रॅटेजी

या नोटीसमध्ये उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मराठा आंदोलन समिती प्रस्तावित हे आंदोलन कसं असणार आहे? तसेच हे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का? तसे नसल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही. याची जबाबदारी कोणाची? या सर्व मुद्द्यांवर 26 फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जरांगे यांना दिले आहेत.

मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर बदल

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर त्यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने जरांगे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला राज्यात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळात मंजूर केला आहे.

मात्र असे असले तरी देखील आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसी समाजामध्येच आमचा समावेश करा. अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी अध्याप देखील आपला आंदोलन कायम ठेवला आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे याचिकेवर सुनावणी पार पडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube