Petrol Diesel Price : कच्च्या तेलाची खरेदी आणि शुद्धीकरण खर्चाच कारण देत मागील 11 दिवसांत इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) भरमसाठ वाढ केलीयं. 11 दिवसांत तब्बल 11 रुपयांपेक्षा अधिक प्रतिलिटर दर वाढल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्याचं चित्र आहे. परंतू एका वृत्तवाहिनीच्या अहवालानूसार यंदाच्या वर्षातील तिमाहीचा आणि मागील 4 वर्षांचा इंधन कंपन्यांचा आलेख पाहता इंधन कंपन्या जोमात आणि सर्वसामान्य नागरिक कोमात गेल्याची परिस्थिती आहे. यंदाच्या वर्षातील तिमाहीत तिन्ही इंधन कंपन्यांचा एकूण नफा 19, 470 कोटी रुपये तर मागील चार वर्षांचा रुपयांचा नफा 97, 625 कोटी इतका असल्याचा अहवाल वृत्तवाहिनीने दिलाय.
कच्च्या तेलाच्या खरेदीचं कारण देत इंधनाच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत, तर मग मागील तिमाही आणि चार वर्षांत इंधन कंपन्यांनी एवढा नफा कमवला तेव्हा इंधन स्वस्त झालं नाही पण आज कच्च तेल महाग झाल्याने तोटा होतोयं. याच एका कारणामुळे इंधन कंपन्यांनी प्रतिलिटर 7 रुपयांपेक्षा अधिक पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आहेत. याचाच अर्थिक ताण सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे.
इंधन कंपन्यांचा तोटा होतोयं, म्हणूनच इंधनाच्या किंमती वाढत असल्याचं सांगितलं जातंय. परंतू आज नवीन आलेल्या आकड्यांवरुन खरं सिद्ध झालंयॉ. यंदाच्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च महिन्यात इंधन कंपन्यांचा नफा 41 टक्के झालायं. विशेष म्हणजे मार्च महिन्यात युद्ध सुरु होतं तरीही कंपन्यांना चांगला नफा मिळालायं. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत इंडियन ऑईल कंपनीला 11,377 कोटी, भारत पेट्रोलियमला 3,191 कोटी, हिंदुस्थान पेट्रोलियमला – 4901 कोटी, इतका नफा मिळालायं. एकंदरीत मागील तीन महिन्यांत इंधन कंपन्यांचा नफा 19,470 कोटी रुपये इतका आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच, सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच
मागील चार वर्षांत इंधन कंपन्यांना 97,625 कोटी रुपयांचा नफा…
मागील तिमाहीच्या नफ्याचा विषय नाही तर मागील 4 वर्षांत इंधन कंपन्यांनी तब्बल 97,625 कोटी रुपये नफा मिळवलायं. यामध्ये इंडियन ऑईल कंपनीने 97, 625 कोटी, भारत पेट्रोलियमने – 65122 कोटी, हिंदुस्थान पेट्रोलियमने 48, 114 कोटी तर ओएनजीसी – 152348 कोटींचा नफा कंपन्यांनी कमवलायं.
इंडियन ऑईल कंपनीने 2022-23 या वर्षांत 8,242 कोटी, 2023-24 या वर्षांत 39,619 कोटी, 2024-25 या वर्षांत 12,962 कोटी,तर 2025-26 साली 36,802 कोटी म्हणजे एकट्या इंडियन ऑईल कंपनीने मागील चार वर्षांत एकूण 97,625 कोटींचा नफा कमावलायं. तर दुसरी भारत पेट्रोलियमने 2022-23 या वर्षांत 1,870 कोटी, 2023-24 वर्षांत 26,674 कोटी, 2024-25 13,725 कोटी रुपये, तर 2025-26 या वर्षांत 23,303 कोटी रुपये म्हणजे चार वर्षांत एकूण 65,122 कोटी रुपयांचा नफा कमावलायं. हिंदुस्थान पेट्रोलियमने 2022-23 या अर्थिक वर्षांत 8,974 कोटी रुपये, 2023-24 या वर्षी 14,694 कोटी, 2024-25 यावर्षी 7,271 कोटी तर 2025-26 यावर्षी 17,175 कोटी म्हणजेच चार वर्षांत एकूण 48,114 कोटी रुपये कमवलेत, आणि ओएनजीसीने 2022-23 या अर्थिक वर्षांत 40,097 कोटी, 2023-24 वर्षांत 40526 कोटी रुपये तर 2024-25 35,610 कोटी रुपये, आणि 2025-26 वर्षांत 36, 115 कोटी रुपये अर्थात चार वर्षांत एकूण 15, 2348 कोटी
रुपये कमवलेत.
