E20 वरून केजरीवालांना पाठिंबा ते गांधी हत्यारे, CJP बैठक अन् प्रशांत किशोर; अभिजीत दिपकेंनी स्पष्टच सांगितलं!

Abhijit dipke on E20 petrol, kejriwal, cjp, prashant kishor अभिजीत दिपकेंनी देशातील मुद्यावरुन आपली राजकिय भुमिका स्पष्ट केली.

Abhijeet Dipake E20 पेट्रोलविरोधातील अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला.

Abhijit Dipke on E20 petrol, Kejriwal, cjp, Prashant Kishor: पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या E20 धोरणाच्या सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारविरोधातील आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. AAPचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) आज, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानाकडे शांततापूर्ण मोर्चा काढला आहे.

ब्रेकिंग : माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केजरीवाल यांच्या या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, हा पाठिंबा कोणत्याही राजकीय पक्षाला नसून E20 पेट्रोलच्या मुद्द्याला असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. “E20च्या मुद्द्यावर जे काही आंदोलन होईल, त्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. आमचा पाठिंबा कोणत्याही पक्षाला नाही, तर E20च्या मुद्द्याला आहे,” अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी मांडली.

‘इथेनॉल मिसळत असाल तर पेट्रोलची किंमत कमी करा’

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर बोलताना अभिजीत दिपके यांनी वाहनांच्या नुकसानाचा आणि पेट्रोलच्या किमतीचा मुद्दा उपस्थित केला. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. “जर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळत असाल, तर पेट्रोलची 100 टक्के किंमत का घेतली जाते? त्यामुळे सरकारने पेट्रोलची किंमत कमी केली पाहिजे,” असे दिपके म्हणाले. E20च्या अंमलबजावणीबाबत सरकारने ग्राहकांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. इथेनॉल मिश्रणामुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक फायदा होत असेल, तर त्याचा परिणाम पेट्रोलच्या किमतीतही दिसला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा चर्चेत; राज्यपालांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी मंजुरी

‘ज्यांनी गांधींची हत्या केली, त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये’

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी यावेळी देशातील राजकीय आणि वैचारिक मुद्द्यांवरही भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर-सहकार्यवाह अतुल लिमये (Atul Limaye) यांना अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी सुनावले. “ज्या लोकांनी गांधींची हत्या केली आणि आंबेडकरांना विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये,” अशी टीकाही त्यांनी केली. या वक्तव्यामुळे दिपके यांनी सत्ताधारी राजकारणावर थेट निशाणा साधला आहे. संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

जंतरमंतर आंदोलनातील अनुभवावर कॉक्रोच जनता पार्टीची बैठक

कॉक्रोच जनता पार्टीच्या आगामी बैठकीत जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान मिळालेले अनुभव आणि त्यातून पुढे काय शिकता आले, यावर चर्चा केली जाणार असल्याचे दिपके यांनी सांगितले. “जंतरमंतरवरील आंदोलनात आम्हाला काय शिकायला मिळाले आणि पुढे आणखी काय चांगले करता येईल, यावर बैठकीत चर्चा होणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पक्षाची संघटनात्मक वाटचाल आणि देशभरात पक्षाचा विस्तार कसा करता येईल, यावरही चर्चा होणार आहे. पक्षाची आगामी भूमिका काय असावी, कोणते मुद्दे जनतेसमोर घेऊन जावेत आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, यावर बैठकीत विचारमंथन होणार असल्याचे दिपके यांनी सांगितले.

E20 पेट्रोल सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात केजरीवालांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा

प्रशांत किशोर यांच्या विजयाचे दिपकेंकडून अभिनंदन

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांना मिळालेल्या विजयावरही अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करत नवीन चेहऱ्यांनी राजकारणात पुढे येण्याची गरज व्यक्त केली. “प्रशांत किशोर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्यांनी राजकारणात आले पाहिजे,” असे दिपके म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पारंपरिक राजकारणाला पर्याय म्हणून नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका त्यांनी मांडल्याचे दिसून येते.

E20 मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापणार?

E20 पेट्रोल धोरणावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आधीच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता कॉक्रोच जनता पार्टीनेही या मुद्द्यावर होणाऱ्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी E20 पेट्रोलबाबत पेट्रोल पंपांवर E20 आणि शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, E20 पेट्रोल शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त असावे आणि पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी असावी, अशा तीन प्रमुख मागण्या केंद्र सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे आता E20 पेट्रोलचा मुद्दा केवळ इंधन धोरणापुरता मर्यादित न राहता ग्राहकांचा आर्थिक भार, वाहनांचे मायलेज आणि पेट्रोलच्या किमतीसह राजकीय आंदोलनाचा मुद्दा बनताना दिसत आहे.

छतावरील सौरऊर्जेबाबत जनजागृतीचा नवा उपक्रम! CEEW ची ‘गुल्लक’ मालिकेसोबत भागीदारी

follow us