Digital Gold : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

Digital Gold सोन्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतानादेखील याचा कोणताही परिणाम डिजिजल सोन्याच्या खरेदीवर झालेला नाही.

Digital Gold : जानेवारी ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

Digital Gold : जानेवारी ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

New Record In UPI Digital Gold : सोन्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतानादेखील याचा कोणताही परिणाम डिजिजल सोन्याच्या खरेदीवर झालेला नसून, जानेवारी महिन्यात एका नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI)आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे.

UPI द्वारे रेकॉर्ड ब्रेक खरेदी

जानेवारीमध्ये UPI द्वारे डिजिटल सोन्याची खरेदी 3,926 कोटींवर पोहोचल्याची नोंद झाली असून, ज्यामध्ये जवळपास 219 दशलक्ष व्यवहार नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे देशातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म NPCI द्वारे चालवल्या जाणाऱ्या UPI द्वारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल सोन्याची खरेदी करण्यात आली आहे.

2025 मध्ये वाढ, नोव्हेंबरमध्ये घट

जानेवारी 2025 मध्ये UPI द्वारे डिजिटल सोन्याची विक्री 762 कोटी होती आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत ती वाढून 2,290 कोटी झाली. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यात घट झाली. डिजिटल सोने सध्या अनियंत्रित असल्याचा इशारा SEBI ने गुंतवणूकदारांना दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये याची विक्री सुमारे 1,200 कोटी आणि 120 दशलक्ष व्यवहारांवर घसरली.

डिसेंबरमध्ये पुन्हा चमकलं सोनं

जागतिक अनिश्चितता आणि वाढत्या बाजारातील अस्थिरतेमुळे डिसेंबरमध्ये सोन्याच्या मागणीत पुन्हा वाढ झाली. ही वाढ डिजिटल सोन्याच्या विक्रीतही दिसून आली, ज्यामध्ये अंदाजे 2,100 कोटींचे 180 दशलक्ष व्यवहार झाले.

पेमेंट अ‍ॅप्समुळे विक्रीत वाढ

पेटीएम, फोनपे, जार, अमेझॉन पे, गुगल पे आणि तनिष्क सारख्या अॅप्सद्वारे डिजिटल सोन्याची विक्री सातत्याने वाढत आहे. सोने ही नेहमीच भारतीय कुटुंबांसाठी एक विश्वासार्ह गुंतवणूक राहिली आहे आणि नियमित बचत दीर्घकालीन अर्थपूर्ण ठरते असल्याचे मत जारचे सह-संस्थापक निश्चय एजी यांनी सांगितले.

डिजिटल सोने लोकप्रिय का होतयं?

सोन्याच्या वाढत्या किमती, त्याची सुरक्षित गुंतवणूक स्थिती, सोपी खरेदी प्रक्रिया, सार्वत्रिक उपलब्धता आणि कमी प्रमाणात गुंतवणूक करण्याची सोय यामुळे डिजिटल सोन्याची लोकप्रियता वाढली आहे. ग्राहक दररोज 1 रूपयांपासून ते अंदाजे 2 लाखांपर्यंत डिजिटल सोने खरेदी करू शकतात.

नियामक अनिश्चितता आणि पर्याय

डिजिटल सोने अद्याप रेग्युलेटेड नसून. त्यावर जीएसटी, स्टोरेज शुल्क आणि प्लॅटफॉर्म शुल्क देखील आकारले जाते. सेबीद्वारे नियंत्रित केलेले गोल्ड ईटीएफ देखील गुंतवणूकदारांसाठी एक पर्याय आहेत, परंतु यासाठी डीमॅट खाते आवश्यक असल्याने, अनेकांना डिजिटल सोने अधिक सोयीस्कर वाटते.

Exit mobile version