Download App

BJP पुन्हा सत्तेत येणं देशासाठी धोकादायक, नंतर पश्चाताप…; केरळ मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

  • Written By: Last Updated:

Pinarayi Vijayan On BJP : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. पुढील वर्षात देशात लोकसभा (Lok Sabha elections) आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सगळ्याचं पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधली आहे. मात्र, तिसऱ्यांदाही सत्तेत भाजपच येणार असे दावे भाजप नेते करत आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी यावर भाष्य केलं. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशासाठी मोठा धोका असेल, असं ते म्हणाले.

यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मोठी मागणी 

मोदी सत्तेत आल्यापासून देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची टीका विरोधक करत असतात. आज एका कार्यक्रमात बोलत असतांना पिनाराई विजयन यांनीही भाजपवर सडकून टीका केली आहे. गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या धोरणावर, आरएसएस आणि भाजपवर त्यांनी जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, आगामी लोकसभा प्रचंड निर्णायक ठरणार आहेत. दोनदा सत्ता भाजपच्या हातात दिली, मात्र भाजप सरकारने जनतेच्या पदरी निराशा टाकली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशासाठी मोठा धोका असेल. त्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, देशात जर एखाद्या समाजाने गाय खाल्ली तर दे देशाचे शत्रू आहेत, असं दाखवलं जात आहे. त्यामुळं जातीय हिंसाचार होत आहे. केंद्र सरकार आणि आरएसएस देशाची विविधता नष्ट करून एका धर्माच्या लोकांचा देश बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की, संविधानात धर्म, जात, पंथ यांचा विचार न करता प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत, मात्र त्यात बदल केला जात आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विजयन म्हणाले की, भाजपलाही कळून चुकले आहे की तिसऱ्यांदा सत्तेवर येणे शक्य नाही. या जाणिवेमुळे त्यांना अलीकडे काही जोखमीची आणि धोकादायक पावले उचलावी लागत आहेत.. देशातील चार राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता आहे. विविध केंद्रीय संस्था तेथे छापे टाकत आहेत. बदलत्या परिस्थितीला भाजप कसा प्रतिसाद देईल, हे यावरून दिसून येते.
भाजप आणखी तीव्रतेने अशा कृती करू शकते. मात्र, जनमत बदलण्यासाठी एवढं पुरेशा ठरणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी एकजूट आणखी मजबूत करावी लागेल, असं ते म्हणाले.

केरळात सीपीआय आणि विरोधी पक्ष कॉंग्रेसने केरळ स्टोरी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पिनाराई विजयन यांनी हा चित्रपट संघ परिवाराची निर्मीती आहे. राज्याविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

Tags

follow us