Video : स्मितहास्य, नमस्कार अन् रंगल्या गप्पा; निवडणुकांच्या धामधुमीत जेव्हा मोदी-राहुल गांधी अचानक भेटतात

PM Modi and Rahul Gandhi हे निवडणुकांच्या धामधुमीत अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यामध्ये गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.

Modi Rahul Gandhi

Modi Rahul Gandhi

PM Modi and Rahul Gandhi suddenly meet in the midst of election fervor : एकीकडे देशामध्ये केरळ, प, बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि पाँडेचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये भाजप आणि काँग्रेस वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप फैरी झाडत आहेत. मात्र या दरम्यान आज 11 एप्रिल रोजी निवडणुकांच्या धामधुमीत संसदेच्या परिसरामध्ये अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना स्मितहास्य, नमस्कार केला आणि त्यांच्यामध्ये बराच वेळ गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.

निवडणुकांच्या धामधुमीत जेव्हा मोदी-राहुल गांधी अचानक भेटतात…

निवडणुकांच्या धामधुमीत संसदेच्या परिसरामध्ये अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एकमेकांच्या समोरासमोर येण्याचं कारण होतं ते म्हणजे आज 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती निमित्त संसद परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित राहिले होते. त्यावेळी मोदी आले असताना त्यांनी अगोदरच येऊन उभे असलेल्या राहुल गांधींना स्मितहास्य केलं, नमस्कार केला आणि त्यांच्यामध्ये बराच वेळ गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी मोदी आणि राहुल गांधी हे गंभीर चर्चा करत असल्याचं दिसत होतं. एकीकडे राज्यांच्या निवडणुका जरी सुरू असल्या तरी देखील जागतिक पातळीवर मात्र युद्धाची पार्श्वभूमी असल्याने त्यावर देखील या नेत्यांनी चर्चा केल्याचं बोललं जात आहे. तसेच या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि मंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महात्मा फुलेंना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.

Exit mobile version