PM Modi Answered to Rahul Gandhi Statement On Hinduism in Loksabha : संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभागृहात भगवान शिवचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली असं ते म्हणाले. मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं वादग्रस्त विधान (Statement On Hinduism) देखील म्हटले आहे. त्यावर आज पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी राहुल यांना बालबुद्धी म्हणून कितीदा सोडणार, कठोर कारवाई व्हावी असं म्हणत कारवाईची मागणी केली आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था – वैद्यकीय सेवा
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 131 वर्षांनी पहिली स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये हिंदूधर्म सहनशीलता शिकवतो. म्हणून त्याचा अभिमान बाळगला होता. मात्र राहुल गांधी यांनी हिंदूंचे संस्कार काढत त्यांच्यावर हिंसक असल्याचे खोटे आरोप केले आहेत. हे हा देश कधीच विसरणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या खोट्या आरोपांना गांभीर्याने घ्यायला हवं. त्यांचा हेतू योग्य नाही. बालबुद्धी म्हणून किती दिवस सोडून देणार? यावर कठोर कारवाई व्हायला हवी. असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील सोमवारी केलेल्या हिंदूंबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
भाजपवर हल्ला करताना राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली असं ते म्हणाले. मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं देखील म्हटले. राहुल गांधी यांच्या विधानावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी भाजप, आरएसएस आणि मोदींना हिंसक म्हटले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला नाही.
तर दुसरीकडे या प्रकरणावर अमित शहा यांनीही तीव्र आक्षेप नोंदवत राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे. एवढी मोठी घटना आवाज करून लपवता येणार नाही. स्वत:ला हिंदू म्हणणारे हिंसाचार करतात, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. मी पुन्हा पुन्हा सांगतो की जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते हिंसाचारावर बोलतात. हिंसा करतात ? असा प्रश्न अमित शहा उपस्थित केला होता.