Modi On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करतांना विधानसभेत वादग्रस्त विधान केलं. यानंतर विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. या टीकेनंतर त्यांनी माफिही मागितली आहे. तरीही भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) नितीश कुमारांवर निशाणा साधला. हे असले नेते माता-भगिनींचे भले करू करणार, खूप खालची पातळी नितीशकुमार यांनी गाठली. त्यांना लाज उरली नाही, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला.
मोबाईल नंबर बंद करण्यापूर्वी ‘हे’ करा, सुप्रीम कोर्टाने दिलेत आदेश
मध्य प्रदेशातील गुना येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम मोदींनी नितीश कुमार याचं थेट नाव घेत जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, जे इंडिया आघाडीचा झेंडा घेऊन फिरत आहेत, जे देशातील सध्याचं सरकार पाडण्यासाठी विविध खेळ्या करत आहेत. त्यांनी विधानसभेत माता-भगिनींविषयी गलिच्छ वक्तव्य केलं. सदनात माता-भगिनीही उपस्थित असतांनीही त्यांनी असभ्य वक्तव्यं केलं. नितीश कुमार यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यामुळं जगात देशाची बेईज्जती झाली, असं मोदी म्हणाले.
नितीश यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी बाळगलं. त्यावरही मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीएम मोदी म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने महिलांविषयी गलिच्छ वक्तव्य केलं. मात्र, इंडियाचा एकही नेता माता-भगिनींच्या अपमानाच्या विरोधात एक शब्दही बोलायला तयार नाही. ज्यांचा माता-भगिनींबद्दल असा दृष्टिकोन आहे, ते तुमचे काही भले करू शकतात किंवा तुमचा आदर करू शकतात का? ते तुमचा आदर करू शकतात का, तुमचा सन्मान राखू शकतात का? असा सवाल मोदींनी केला. महिलांविषयी आदर उरला नाही, काय दुर्दैव या देशावर आलं, असंही मोदी म्हणाले.
नितीश कुमार नेमंक काय म्हणाले होते?
नितीश कुमार म्हणाले होते की, मुलगी शिकली, तिने लग्न केलं की, पुरुष रोज रात्री संबंध निर्माण करतात. यामुळं मूल जन्माला येतं. मात्र, मुली साक्षर नसतील तर प्रजनन दर घरसरतोय. जर मुलगी सुशिक्षित असेल तर जनन दर सरासरी दोन टक्क्यांपर्यंत घसरतो आणि जर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले तर राष्ट्रीय स्तरावर जनन दर 1.7 टक्क्यांपर्यंत घसरतो, असं नितीश कुमार म्हणाले होते.
दरम्यान, विविध मुद्द्यांवरून देशात राजकारण तापले असताना नितीश कुमार यांच्या वक्तव्याने गदारोळ सुरू झाला. त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. मात्र, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या आई राबडी देवी यांनी नितीश कुमार यांची बाजू घेतली असून चुकून त्यांच्या तोंडून तसे विधान निघून गेले, असं त्या म्हणाल्या आहेत.