आमचं सरकार येण्याची भविष्यवाणी करणाऱ्या कॉंग्रेसच्या तोंडात साखर पडो, मोदींचा राज्यसभेत टोला

PM Modi यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण अभिनंदन प्रस्तावाला आज राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

PM Modi आमचं सरकार येण्याची भविष्यवाणी करणाऱ्या कॉंग्रेसच्या तोंडात साखर पडो, मोदींचा राज्यसभेत टोला

PM Modi

PM Modi Criticize Congress in Rajyasabha : आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. (Parliament Session ) राष्ट्रपतींच्या अभिभाषण अभिनंदन प्रस्तावाला आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी उत्तर दिले आहे. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, कॉंग्रेसवाल्यांच्या तोंडात साखर पडो की, त्यांनी आम्हाला एक तृतीयांश सरकार म्हणत आमचं सरकार येणार असल्याची भविष्यवाणी केली. तसेच देशवासीयांनी प्रोपोगंडा बाजूला सारत विश्वासाचं राजकारण करणाऱ्या आम्हाला निवडलं. आमची 10 वर्ष झाली आणखी 20 वर्ष बाकी.

गर्भवती माता अन् बालकांना मिळणाऱ्या आहारात सापाचं पिल्लू, विधानसभेत विश्वजीत कदम आक्रमक

पुढे मोदी म्हणाले की, संविधान हे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे आमच्या सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवलं. त्यावेळी याच काँग्रेस पक्षाने 26 जानेवारी असताना संविधान दिन साजरा करण्याची काय गरज? असा सवाल उपस्थित केला होता. तेच काँग्रेसवाले आज संविधान वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणत त्यांनी निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि इंडिया आघाडीने भाजपवर संविधान बदलणार असल्याच्या केलेल्या आरोपांना उत्तर दिलं.

Sidharth Malhotra: ‘सिद्धार्थ मल्होत्राच्या जीवाला धोका…’; अभिनेत्याचे नाव घेऊन चाहतीला लागला 50 लाखांचा चुना

बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या संविधानामुळे मला ही संधी मिळाली. तर जनतेने ही संधी मला पाठिंबाच्या माध्यमातून दिली. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेसाठी जनतेने आम्हाला हा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात आम्ही गरिबी विरोधात निर्णय लढा देऊ. भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर नेणार आहोत. याच कार्यासाठी जनतेने आम्हालाही संधी दिली आहे. असं अश्वासन यावेळी मोदी यांनी दिलं. मोदींच्या या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Exit mobile version