PM Modi Solapur Visit : या अगोदर देशात गेले कित्येक वर्ष गरिबी हटावचा नारा देण्यात आला होता. (PM Modi Solapur Visit ) मात्र तरी देखील गरिबी हटली नाही. त्यामध्ये म्हटलं जात होतं की, अर्धी भाकरी खाऊ मात्र अर्धीच का? मोदी आहेत. तुम्ही आता पूर्ण भाकरी खाऊ शकता. असं म्हणत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी कॉंग्रेसच्या गरिबी हटाववर निशाणा साधला. ते आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
PM Modi : असं घर लहानपणी मलाही मिळालं असतं तर… गृहप्रकल्पाच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदी भावूक
यावेळी माकप नेते आडम मास्तर यांच्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, मी 2019 ला जेव्हा आडम यांना भेटलो तेव्हा ते बारीक होते. आता मात्र त्यांची तब्येत सुधारली आहे. कारण त्यांनी यशाची फळ खाल्ली आहेत. हा देखील मोदींच्या गॅरंटीचा परिणाम आहे. असं म्हणत चेष्टा करत मोदी यांनी आडम यांचंही कौतुक केलं.
Musafiraa Trailer: प्रेम अन् मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित
आमचं सरकार आलं तेव्हाच मी हे सरकार गरिबांचं असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही गरिबांचे जीवन सुखकर करण्यासाठी एकापेक्षा एक योजना आणल्या. त्यामध्ये शौचालय, घर यावर सर्वात पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं. दोन प्रकारचे विचार असतात एक लोकांना भडकवण्याचा काम करतात. मात्र आम्ही गरिबांचा कल्याण करण्याचा विचार करतो. या अगोदर देशात गेले कित्येक वर्ष गरिबी हटावचा नारा देण्यात आला होता. मात्र तरी देखील गरिबी हटली नाही. त्यामध्ये म्हटलं जात होतं की, अर्धी भाकरी खाऊ मात्र अर्धीच का? मोदी आहेत. तुम्ही आता पूर्ण भाकरी खाऊ शकता.
‘संघर्ष अन् बरच काही’, मोहनलालच्या ‘मलैकोटै वालिबन’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
तसेच माझं अहमदाबाद आणि सोलापूरं एक विशेष नात आहे. कारण सोलापुरातील पद्मशाली समाज अहमदाबादमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. पहिल्या सरकारमध्ये गरिबांच्या नावावर अनेक योजना बनवल्या जात होत्या. मात्र गरिबांचा सर्व पैसा मधल्या मध्येच इतर लोक हडप करत होते. त्या सरकारची नियत, नीती आणि निष्ठा साफ नव्हती. पण आता मोदींची गॅरंटी आहे की, सरकारचा लाभ हा थेट लाभार्थ्याला मिळेल. आमच्या सरकारमध्ये गरिबांचा पैसा कुणाला खाता येत नसल्याने ते आमच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत.
तसेच यावेळी अनेक गरिबांसाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख मोदी यांनी केला. या गरीब लोकांना 2014 पर्यंत कोणी विचारत नव्हतं. त्याच लोकांना मोदींनी पुजलं आहे. तसेच आतापर्यंत फॅशनचा विचार केला जात होता. मात्र जे लोक फॅशनसाठी कपडे बनवतात. त्यांचा विचार कोणीही केला नव्हता. आम्ही त्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. त्याच अंतर्गत तुम्ही माझ्या अंगावर पाहत असलेले काही जॅकेट हे सोलापुरातील एक व्यक्ती मला बनवून देतो. मी नाही म्हटलं तरी तो हे जॅकेट पाठवत असतो. आजही तो मला भेटला आणि म्हटला की, मी जॅकेट आणले आहेत. आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत टॉप तीन अर्थव्यवस्थेपैकी एक असेल. असं म्हणत यावेळी मोदी यांनी पुन्हा एका नागरिकांच्या भल्यासाठी प्रार्थना केली.