Download App

‘सनातन’साठी PM Modi मैदानात! इंडिया आघाडीवर हल्लाबोल

PM Modi : तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत देशभरात नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर तक्रारीही दाखल झाल्या आहेत. देशभरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यानंतर आता खुद्द पंतप्रधान मोदीच (PM Modi) मैदानात उतरले आहेत. सनातन धर्मावरील उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने त्यांनी इंडिया आघाडीवर (India Alliance) घणाघाती टीका केली.

‘इंडिया’ची पहिली सभा ठरली! भोपाळमध्ये ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा…

पंतप्रधान मोदी (PM Modi) आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले, इंडी आणि घमंडिया आघाडीचे लोक हे त्या सनातन पंरपरेला (Sanatan Dharma Row) नष्ट करण्याच्या गोष्टी करत आहेत ज्या सनातनपासून प्रेरणा घेत स्वामी विवेकानंदांनी समाजातील वाईट चालीरितींबाबत लोकांना जागृत केले. पण, हे इंडी आघाडीचे लोक त्याच सनातनला नष्ट करण्याच्या बाता मारत आहेत. ही सनातनचीच ताकद होती की स्वातंत्र्यपूर्व काळात फाशीची शिक्षा होणारे स्वातंत्र्यसैनिक सुद्धा पुन्हा भारतातच जन्म मिळावा असे म्हणायचे. ज्या सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताला एकसंघ ठेवले आज त्याच सनातनला विखंडीत करण्याची या लोकांची इच्छा आहे.

आता या लोकांनी उघडपणे बोलण्यास सुरुवात केली असून येथून पुढे ते हल्ले आधिक तीव्र करतील त्यामुळे देशाच्या कोपऱ्या न कोपऱ्यातील सनातनी व्यक्ती, या देशावर प्रेम करणाऱ्याने, या देशाच्या माती आणि देशातील कोट्यावधी लोकांवर प्रेम करणाऱ्याने तसेच प्रत्येकानेच सतर्क राहण्याची गरज आहे. सनातन नष्ट करून हे लोक देशाला पुन्हा एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलू पाहत आहेत. पण, आपल्याला एकत्र येऊन अशा ताकदींना रोखायचे आहे. त्यांचे मनसूबे उधळून लावायचे आहेत, असे मोदी (PM Modi) म्हणाले.

Ram Mandir : राम जन्मभूमी परिसरात आढळले पुरातन अवशेष; मूर्ती अन् प्राचीन स्तंभ

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन ?

सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतरही स्टॅलिन यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज