तिसऱ्यांदा PM होताच मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, पहिल्याच दिवशी ‘या’ फाईलवर केली स्वाक्षरी

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Letsupp Image   2024 06 10T115146.211

Letsupp Image 2024 06 10T115146.211

नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (10 जून) पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाइलवर मोदींनी स्वाक्षरी केली आहे. (PM’s 1st order in third term, signs off on release of PM Kisan Nidhi funds)

पंतप्रधान किसान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार असून अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठकही आज होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सरकार सर्व मंत्र्यांना मंत्रिपदाचे वाटप करू शकते.

मोदींच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांच्या वर

काय म्हणाले पीएम मोदी? 

किसान सन्मान निधीच्य फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर मोदींनी मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यासाठी सातत्याने काम करत आले असून, यापुढेही करत राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

शिंदेंना कुमारस्वामी अन् चिराग भारी; 5 आणि 2 खासदार असतानाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद

यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, 16 व्या हप्त्याचे पैसे 28 फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर 2000-2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

Exit mobile version