PM Narendra Modi : जी-20 शिखर परिषदेनंतर आता यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या(Republic Day) कार्यक्रमासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(Joe Biden) हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी प्रजासत्ताक दिनासाठी जो बायडेन यांना आमंत्रित केले आहे. यासंदर्भात अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी(Eric Garcetti) यांनी माहिती दिली आहे.
US President Joe Biden has been invited to the January 26-Republic Day celebrations by PM Modi, during the bilateral meeting on the sidelines of the G20 summit, says US Ambassador Eric Garcetti. pic.twitter.com/FfrjWrnbd1
— ANI (@ANI) September 20, 2023
नूकतीच दिल्लीत जी-20 शिखर परिषद पार पडली. या परिषदेत पार पडलेल्या द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना आमंत्रित केलं होतं, दरम्यान भारतात QUAD शिखर परिषदेचं नियोजन केलं जात आहे का? यावर, अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेटी यांनी मला याबाबत काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.
प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अद्याप जो बायडेन यांनी हे निमंत्रण स्विकारलं की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झालं नसून जो बायडेन (Joe Biden) यांनी हे निमंत्रण स्विकारल्यास 6 महिन्यातला त्यांचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे.
Rocketry: आर माधवनला SIIMA अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘या’ सिनेमासाठी दोन पुरस्कार प्राप्त
देशात 2015 साली पंतप्रधान मोदींचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा(Barack Obama) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. भारत-अमेरिका संबंधातील हा मोठा क्षण असल्याचं मानलं गेलं.
..तर ईडी, जिल्हा बँकेच्या चौकशीची यादीच बाहेर काढू; मुश्रीफांविरोधात शरद पवार गट आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) सत्तेत आल्यापासून भारत आणि अमेरिकेत संबंध चांगलेच घट्ट झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. या दौऱ्यात मोठ्या जल्लोषात अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Pm Narendra Modi) स्वागत केलं होतं. त्यानंतर नूकत्याचं झालेल्या जी -20 परिषदेलाही जो बायडेन यांनी आपली हजेरी लावली होती.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे की नाही? याबाबत अमेरिकेच्या भारतातील राजदूताने माहिती दिली असली तरीही अद्याप परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी जो बायडेन प्रमुख पाहुणे असणार की नाही? याबाबत अस्पष्टताच आहे.