Rocketry: आर माधवनला SIIMA अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘या’ सिनेमासाठी दोन पुरस्कार प्राप्त

Rocketry: आर माधवनला SIIMA अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘या’ सिनेमासाठी दोन पुरस्कार प्राप्त

R Madhavan: आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ (Rocketry The Nambi Effect) ने SIIMA 2023 सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor) आर माधवनला पुरस्कार प्राप्त करण्यात यश आला आहे. (Social media) SIIMA 2023 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार (SIIMA Award) विजेते आर. माधवनचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)


साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) 2023 च्या एका कार्यक्रमामध्ये बहु-प्रतिभावान अभिनेता आर माधवनने एकदा नव्हे तर अनेकवेळा आपली शैली सिद्ध केली आणि अष्टपैलू अभिनय आणि अभिनेता म्हणून आपली कायम धमक दाखवली आहे. माधवनचे दिग्दर्शनातील पदार्पण असलेल्या “रॉकेटरी – द नंबी इफेक्ट,” हा एका उंच शिखरावर जाऊन पोहचला आहे, कारण देखील तितकच खास आहे.

तसेच अपवादात्मक कथाकथन आणि दिग्दर्शनाच्या चातुर्यासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक (तमिळ) हा सन्मान मिळवला आहे, आणि ही कामगिरी त्यांची कलेशी असलेली बांधिलकी दाखवून देते. माधवनचे अभिनय कौशल्य SIIMA 2023 मध्ये देखील ओळखले गेले आणि “रॉकेटरी: द नंबी इफेक्ट” मधील भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या भूमिकेसाठी त्याला प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून (तमिळ) पुरस्कार देण्यात आला आहे.

Aapan Yana Pahilat Ka: ‘आपण यांना पाहिलंत का?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

माधवनने अलीकडेच त्याच्या “रॉकेटरी: द नंबी इफेक्ट” साठी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. आर माधवन लवकरच शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामा सिनेमात ‘टेस्ट’ मध्ये बघायला मिळणार आहे. तसेच २०२१ वर्षसाठी ६९वे राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये ‘गोदावरी’ या मराठी सिनेमासाठी निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. तेलुगू सिनेमा ‘आरआरआर’ला निखळ मनोरंजनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा-द राईज’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर आलिया भट (गंगुबाई काठियावाडी) आणि कृती सेनन (मिमी) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube