Download App

“PM मोदी पू्र्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज”, भाजप खासदाराच्या वक्तव्याने मोठा वाद

मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा पुरोहित यांनी केला.

PM Narendra Modi : भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या (Pradeep Purohit) एका वक्त्यव्यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या खासदाराच्या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे. ओडिशातील बारगड मतदारसंघातील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच (PM Narendra Modi) छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा पुरोहित (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना खासदार पुरोहित यांनी अकलेचे तारे तोडले. मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा या खासदारांनी केला. आता त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगती पथावर नेण्यासाठी पुन्हा जन्म घेतला असा अजब दावाही पुरोहित यांनी केला. यासाठी त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संतांचा आधार घेतला. या संतांनीच आपल्याला ही माहिती दिली असेही खासदार पुरोहित म्हणाले.

दरम्यान, पुरोहित यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. विरोध पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या खासदाराच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरही लोकांनी पुरोहित यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रदीप पुरोहित यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.

follow us