Download App

भीषण अपघातात 280 मृत्यू, दोन फोन अन्…; घटनास्थळावर PM मोदी अॅक्शन मोडमध्ये

  • Written By: Last Updated:

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पीएम मोदींनी मंत्र्यांना घटनास्थळावरून केला फोन

अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सध्या सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि त्यादरम्यान त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळी पीएम मोदी मोबाईल फोनवर बोलताना दिसले. पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली वागणूक मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे.

जखमींची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी रुग्णालयात पोहोचले

घटनास्थळी भेट दिल्यानंतर पीएम मोदी बालासोर येथील रुग्णालयात पोहोचले जेथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदींना रुग्णालयात पाहून काही जखमी प्रवासी भावूक झाले आणि तिथेच रडू लागले. पीएम मोदींनी रुग्णालयात दाखल जखमींचे सांत्वन केले. तेथे बराच वेळ थांबून त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या उपचाराची माहितीही घेतली.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज