Download App

PM Modi Speech : जीएसटी बचत महोत्सव ते स्वदेशीचा मंत्र ; PM मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करत आहेत.  भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते.

  • Written By: Last Updated:

 PM Modi Speech Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करत आहेत.  भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होती.  राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून अनेक मोठे धमाके केले आहेत…

जीएसटी बचत महोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी (BJP) यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नवरात्रीच्या सुरुवातीची घोषणा केली. देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, 22 सप्टेंबर (PM Modi) हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी नवीन जीएसटी लागू केला जाईल. या प्रसंगाचे विशेष वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, हा केवळ उत्सव साजरा करण्याचा काळ नाही, तर आर्थिक विकास आणि कर सुधारणांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

जीएसटीमध्ये सुधारणा

जीएसटीमध्ये सुधारणा करण्याचा हा निर्णय आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जीएसटी सुधारणांचा देशातील सर्व घटकांना फायदा होईल. पूर्वीची कर प्रणाली, जी विविध करांचे मिश्रण होती, त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटी लागू केला. आता देश डझनभर करांच्या ओझ्यातून मुक्त झाला आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’ चे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले,  ‘नागरिक देवो भव:’ हा मंत्र, ज्याच्या मदतीने आपण पुढे जात आहोत, तो जीएसटीच्या पुढील पिढीतील सुधारणांमध्ये प्रतिबिंबित होईल. गेल्या एका वर्षात आयकर आणि जीएसटीबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील लोकांचे 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचतील. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल.

स्वदेशीचा मंत्र

पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत; आपण त्यापासून स्वतःला मुक्त केले पाहिजे. आपण स्वदेशी, भारतात बनवलेल्या, आपल्याच लोकांच्या घामाने बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. प्रत्येक दुकान स्वदेशी उत्पादनांनी सजवले पाहिजे. अभिमानाने घोषित करा की हे स्वदेशी आहे, अभिमानाने घोषित करा की मी स्वदेशी आहे. ही प्रत्येक भारतीयाची वृत्ती बनली पाहिजे. जेव्हा हे होईल तेव्हाच भारताचा वेगाने विकास होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

follow us