PM Modi’s appeal brings about major changes in the economy : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहक देशांपैकी एक मानला जातो. भारतीयांच्या दैनंदिन जीवनात, संस्कृतीत आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सोन्याला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ असो. सण-उत्सव असो किंवा गुंतवणुकीचा विचार असो, भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असतात. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. जर समाज ते लोकांनी मान्य देखील केलं, तर त्याचा परिणाम केवळ दागिन्यांच्या बाजारावरच नाही तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
भारतात सर्वर्शी शेकडो टन सोन्याची खरेदी केली जाते. 2025 मध्ये देशातील सोन्याची एकूण मागणी सुमारे 710.9 टन इतकी होती. तर 2026 च्या पहिल्या तिमाहीतच देशात 151 टन सोन्याची मागणी नोंदवली गेली. विशेष म्हणजे, यामध्ये दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी घेतल्या जाणाऱ्या गोल्ड बार, नाणी आणि ETF मध्ये वाढ दिसून आली आहे. म्हणजेच भारतीय नागरिक आता सोन्याकडे फक्त दागिन्यांच्या स्वरूपात नव्हे तर सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून देखील पाहत आहेत.
मात्र भारताकडे स्वतःचे पुरेसे सोन्याचे उत्पादन नसल्यामुळे देशाला गरजेपैकी बहुतांश सोनं परदेशातून आयात करावं लागतं. आणि हाच मुद्दा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठं आव्हान बनत आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2025-26 आर्थिक वर्षातील आकडेवारीनुसार, भारताने तब्बल 71.98 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 6 लाख कोटी रुपयांचं सोनं आयात केलं आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक आयात मानली जात आहे. याआधी 2024-25 या आर्थिक वर्षात सोन्याची आयात 58 अब्ज डॉलर्स इतकी होती. म्हणजेच केवळ एका वर्षात आयातीच्या मूल्यामध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोन खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, पंतप्रधान मोदींचं देशातील जनतेला आवाहन
विशेष म्हणजे, सोन्याच्या आयतीचं मूल्य वाढलं असलं तरी प्रत्यक्ष आयात झालेल्या सोन्याच्या प्रमाणात मात्र थोडी घट झाली आहे. 2025-26 मध्ये भारताने 721.03 टन सोनं आयात केलं, तर 2024-25 मध्ये हे प्रमाण 757.09 टन होतं. म्हणजेच वजनाच्या प्रमाणात जवळपास 4.76 टक्क्यांनी घट आली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे भारताला जास्त पैसे मोजावे लागले.
भारताला सोन्याचा सर्वाधिक पुरवठा स्वित्झर्लंडकडून होतो. भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीत स्वित्झर्लंडचा वाटा जवळपास 40 टक्के आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईचा 16 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेचा 10 टक्के वाटा आहे. या देशांकडून भारत मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करत असल्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर जातात.
याचाच परिणाम भारताच्या व्यापार तुटीवर म्हणजेच ट्रेंड डेसीफिटवर होताना दिसतोय. सध्या भारताची व्यापार तूट तब्बल 333.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. कारण भारताला सोन्याची खरेदी डॉलरमध्ये करावी लागते. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण निर्माण होतो आणि रुपयावर दबाव वाढतो. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते, जर भारतीयांनी काही काळासाठी सोन्याची खरेदी कमी केली, तर सोलरची मागणी घटू शकते आणि रुपयाला
स्थैर्य मिळण्यास मदत होऊ शकते.
जर नागरिकांनी सोन्याऐवजी बँक एफडी, एसआयपी, म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली, तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो. कारण सध्या मोठ्या प्रमाणात पैसा सोन्यात गुंतवला जातो आणि तो अनेकदा दीर्घकाळ निष्क्रिय राहतो. पण तोच पैसा उद्योग, उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि व्यवसायांमध्ये गुंतला तर आर्थिक विकासाला अधिक गती मिळू शकते. बँकांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल, उद्योगांना कर्जपुरवठा वाढेल आणि रोजगारनिर्मितीलादेखील चालना मिळू शकते.
शासनमान्यता नसतानाही सुरू होत्या शाळा; शिक्षण विभागाच्या तपासणीत मोठा खुलासा, 76 शाळा बंद तर 111 संस्थांवर गुन्हे दाखल
मात्र सोन्याची खरेदी अचानक थांबण्याचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. भारतातील दागिने उद्योग हा लाखो लोकांच्या रोजगारही जोडलेला आहे. सोनार, कारागीर, लघु व्यापारी, दागिने विक्रेते आणि शोरूममधील कर्मचारी यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या व्यवसायावर अवलंबून आहे. जर एका वर्षासाठी सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली, तर या उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. विशेषतः लग्नसराई आणि सणांच्या काळात बाजारपेठ मंदावण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तज्ज्ञांचं मत आहे की सोन्याची खरेदी पूर्णपणे बंद करण्यापेक्षा संतुलित गुंतवणुकीची मानसिकता विकसित होणं अधिक महत्वाचं आहे. नव्या पिढीचा कल आता एसआयपी, इक्विटी, डिजिटल गुंतवणूक आणि आधुनिक आर्थिक पर्यायांकडे दिसत आहे. त्यामुळे भविष्यत भारताच्या गुंतवणूक संस्कृतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
मात्र भारतीय समाजासाठी सोनं हे फक्त गुंतवणुकीचा साधन नाही. ते परंपरा, संस्कृती, सुरक्षितता आणि भावनिक नात्यांचं प्रतीक आहे. त्यामुळे सोन्यापासून पूर्णपणे दूर जाणं भारतीयांसाठी सहज शक्य नाही. पण जर सोन्यावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी झालं आणि नागरिकांनी संतुलित गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारला, तर त्याचा फायदा केवळ व्यक्तींनाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होऊ शकतो.
