PM Modi News : पीएम सूर्य घर योजनेचा लाभ मिळालेल्या काही कुटुंबांचा अनुभव केरळ येथील के. गोपीकृष्णन यांनी सांगितला. ते म्हणाले, आधी लोकांना विजेचे बिल 3 हजार रुपयांपर्यंत येत होते. पण आता त्यांचे बिल फक्त 240 ते 250 रुपयांपर्यंत येत आहे. वीज तयार करून तुम्ही किती कमाई करता? असं जेव्हा पीएम मोदींनी विचारलं तेव्हा गोपीकृष्णन काहीसे गोंधळले. त्यांची भावमुद्रा पाहून मोदींनी घाबरू नका येथे काही इनकम टॅक्स येणार नाही अशी मिश्कील टिप्पणी केली. यानंतर मग गोपीकृष्णन यांनी सांगितले की याद्वारे दरमहा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.
पीएम मुद्रा योजनेचे लाभार्थी के. गोपीकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपली यशोगाथा सांगितली. गोपीकृष्णन जेव्हा दुबईत होते तेव्हा त्यांना या सरकारी योजनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मुद्रा योजनेसाठी अर्जही केला. पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने वीज तयार करतो हे देखील त्यांनी पीएम मोदींना सांगितले.
एका घरावर सूर्य घराचे काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागतो. ज्यावेळी मी दुबई सोडून भारतात आलो आणि पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून काम सुरू केले. तेव्हा खरंतर कुटुंबिय टेन्शनमध्ये होते. त्यांना वाटायचं की हा मुलगा खरंच कर्जाची परतफेड करू शकेल का.. पण ईश्वराच्या कृपेने सर्वकाही चांगलं घडलं असे गोपीकृष्णन म्हणाले.
PM Modi यांना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट पुरस्कार प्रदान
यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 33 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे गॅरंटी मुक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक लोकांना त्यांच्यातील उद्यमशीलता कौशल्याचे प्रदर्शन करता आले. या माध्यमातून देशातील युवकांना त्यांच्यातील उद्यमशीलतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आहे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याचा आत्मविश्वास त्यांना यातून मिळाला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.