PM Narendra Modi Big Announcement on Independence Day 2025 : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी (Independance Day 2025) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर पीएम मोदींनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी आपल्या देशातील युवकांसाठी मोठी घोषणा केली. आज म्हणजेच 15 ऑगस्टपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू झाली आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मोठ्या घोषणा केल्या. जीएसटीच्या आढाव्यासह त्यांनी आज पीएम विकसित भारत योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पहिली नोकरी मिळाल्यानंतर युवकांना 15 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. आजपासूनच ही योजना देशभरात लागू झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या योजनेसाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi hoists the national flag at the Red Fort. #IndependenceDay
(Video Source: DD) pic.twitter.com/UnthwfL72O
— ANI (@ANI) August 15, 2025
खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळाल्यानंतर संबंधित युवक आणि युवतींना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत आगामी दोन वर्षांत साडेतीन कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या योजनेत सरकारने उत्पादन क्षेत्रावर फोकस केला आहे. याचाच विचार करून योजना तयार करण्यात आली आहे. एखाद्या युवकाने पहिल्यांदाच एखाद्या कंपनीत जॉब सुरू केला त्यावेळी त्याला सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेत काही अटी देखील आहेत. या अंतर्गत नोकरी मिळवणाऱ्या युवकाला त्या कंपनीत कमीत कमी सहा महिने काम करावे लागेल. यासह संबंधित कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्या जात असतील तरच अनुदान मिळेल.
या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या कंपनीत रुजू होताल त्यावेळी पीएफ अकाउंट (PF Account) उघडले जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र होताल. या योजनेतील पहिला हप्ता सहा महिन्यांनंतर थेट खात्यात जमा करण्यात येईल.