Download App

PM Modi : दिवाळीत देशवासियांना मिळणार गिफ्ट; PM मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा

दिवाळीत जीएसटीचा आढावा घेतला जाईल आणि टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असे मोदी यांनी सांगितले.

PM Modi Big Announcement on GST : देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी (Independance Day 2025) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यानंतर पीएम मोदींनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी आपल्या देशातील युवकांसाठी मोठी घोषणा केली. दिवाळीत जीएसटीचा आढावा घेतला जाईल आणि टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. तसेच मोदींनी मिशन सुदर्शन चक्रचीही घोषणा लाल किल्ल्यावरून केली.

मी यंदा तुमच्या सर्वांची दिवाळी डबल दिवाळी करण्याचे काम करणार आहे. या दिवाळीत देशवासियांना सर्वात मोठे गिफ्ट देणार आहोत. मागील आठ वर्षात जीएसटीत मोठ्या सुधारणा केल्या आहेत. देशातील करांत सुधारणा केली. आता आठ वर्षांनंतर या जीएसटीचा आढावा घेणार आहोत. यासाठी एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली. या समितीबरोबर चर्चा केली. राज्य सरकारांशीही चर्चा केली. आता आम्ही नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आणणर आहोत. यंदाच्या दिवाळीआधी हे एक मोठे गिफ्ट असेल. यामुळे सर्वसामान्यांसाठीचे टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी होतील असे पीएम मोदी यांनी सांगितले.

देशातील युवकांसाठी PM मोदींची मोठी घोषणा; आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू

सुदर्शन चक्र मिशन होणार लाँच

देशात सुदर्शन चक्र मिशन लाँच करण्यात येणार आहे. आणीबाणीच्या पापींना आणि हत्याऱ्यांना कायम लक्षात ठेवावं लागेल. आता आपण 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याची शपथ घेतली आहे. ही शपथ पूर्ण करणारच आहोत. यासाठी थांबणार नाही आणि झुकणारही नाही असे मोदी म्हणाले.

टॅरिफवर डोनाल्ड ट्रम्पना उत्तर

ट्रम्प सरकारने भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला आहे. यामुळे भारताची मोठी कोंडी झाली आहे. आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी काहीतरी बोलतील असे अपेक्षित होते. मोदी यांनी ट्रम्प यांना चांगलेच सुनावले. शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतात. त्यांनीच आज भारताला अनेक उत्पादनांचा अव्वल उत्पादक बनवले आहे. भारत शेतकऱ्यांच्या हिताशी आजिबात तडजोड करणार नाही. कोणतेही हानिकारक धोरण स्वीकारणार नाही. कोणत्याही प्रतिकूल धोरणापासून शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मोदी भिंतीसारखा उभा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाविषयी सूतोवाच केले.

follow us