Download App

PM Modi Interview : कोणालाही घाबरण्याची गरज नाही, माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत!

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : “माझ्याकडे मोठ्या योजना आहेत… कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी, दडपण्यासाठी नाहीत तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत काय काय घडणार याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग सांगितले आहे. ते ANI ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (PM Narendra Modi ANI Interview )

मोदी म्हणाले की, माझे लक्ष्य 2024 नसून 2047 आहे, काँग्रेस सरकारचे मॉडेल आणि भाजप सरकारचे मॉडेल पहा असेही मोदी म्हणाले. मुलाखतीत मोदींनी इलेक्टोरल बाँड, एलॉन मस्क, सनातन धर्म, राम मंदिर यासस अनेक विषयांवरही मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

2047 पर्यंतच्या व्हिजनबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “माझ्याकडे मोठ्या योजना आहेत… कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा कुणाला कमी लेखण्यासाठी नाहीत. ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जातात” पंतप्रधान म्हणाले की, माझे निर्णय देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत. मी सर्वकाही केले आहे असे नाही पण, मी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही बरेच काही करणे बाकी असल्याचे मोदी म्हणाले. जेव्हा देशवासीय देश चालवण्याची जबाबदारी देतात, तेव्हा फक्त देशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता घराणेशाहीवर भाष्य केले. ते म्हणाले की, काही राजकीय पक्ष यापूर्वी कुटुंब आणि त्याची पाळमुळं सांभाळण्यासाठी आपली शक्ती

एक राष्ट्र एक निवडणूक ही आमची वचनबद्धता

यावेळी मोदींनी एक राष्ट्र एक निवडणूक यावरही भाष्य केले. एक राष्ट्र एक निवडणूक ही आमची वचनबद्धता आहे. देशात अनेक लोक आले आहेत ज्यांनी याबाबत समितीला सूचना दिल्या आहेत. या सूचना खूप सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे मोदींनी सांगितले. त्यामुळे जर आपण या अहवालाची अंमलबजावणी करू शकलो तर देशाला खूप फायदा होईल असा विश्वास मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

follow us