PM Narendra Modi : पाच राज्यातील निवडणुकीत तीन राज्यात भाजपने बहुमत मिळविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही हिंदी राज्यात भाजपला यश मिळाले आहे. परंतु दक्षिणेतील तेलंगण राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजप (BJP) हा पक्ष केवळ हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे. या पक्षाला दक्षिण भारतात जनाधार मिळत नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत थेट उत्तर दिले. तसेच भाजपला इतर भागात यश मिळत नाही, असा दावाही पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावला आहे.
Year Ender 2023 : 2048 धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू… कोहलीसाठी हे वर्ष ठरले ‘विराट’
मोदी म्हणाले, भाजप पक्ष स्थापन झाल्यापासून त्याच्याबद्दल चुकीच्या धारणा आहेत. आम्हाला ब्राह्मण-बनिया यांचा पक्ष म्हटले जाते. तर नेहमी आमचा पक्ष शहरी भागातील आहे, असा प्रचार केला जातो. परंतु एकामागून एका निवडणुकीत आम्ही ते खोडून काढले आहे. देशातील प्रत्येक भागातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात आहे. तर अनेक राज्यात आम्ही विरोधी पक्ष आहोत. त्या राज्यात आम्ही लोकांमध्ये जावून काम करत आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड राज्यात आम्ही विरोधी पक्ष आहोत. बिहारमध्ये आम्हाला जनतेचे समर्थन होते. तर सहा महिन्यापूर्वी कर्नाटकात आमचे सरकार आहेत. तर पुदुचेरीमध्ये आमचे सरकार आहे. सध्या 16 राज्यात आमची सत्ता आहे. तर आठ राज्यात आम्ही प्रमुख विरोध पक्ष आहे.
बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का, कुस्ती महासंघाच्या कार्यालयाचा पत्ता बदलला
2014 मध्ये आमचे स्थान एकदम कमी होते. आता देशातील पूर्वोत्तर भागाचील सहा राज्यांत आमचे सरकार आहे. त्यात नागालँड, मेघालय असे ख्रिश्चन बहुल राज्यात आमची सत्ता आहे. दक्षिण भारताचा विचार केल्यास लोकसभेच्या सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत. आमचे पक्षाचे सुरुवातीला केवळ दोन खासदार होते. आता 303 खासदारांपर्यंत आमचा प्रवास झाला आहे. देशातील सर्व भागातील लोकांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो का, असा सवालही मोदींनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील प्रचारामुळे पक्षाला मोठे यश मिळते का ? या प्रश्नाला मोदी यांनी उत्तर देताना म्हटले की, भाजप कॅडर पक्ष आहे. आमच्याकडे समर्पित कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. ते जनतेत जावून काम करतात. त्यामुळे मला श्रेय देण्यापेक्षा कार्यकर्ते व त्यांच्या कष्टाला श्रेय दिले पाहिजे.