Download App

Parliament Security Breach : ‘संसदेतील प्रकार गंभीर, सखोल तपास गरजेचा’; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Parliament Security Breach : संसदेत काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेने देशभरात मोठी (Parliament Security Breach) खळबळ उडाली. या घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. या मुद्द्यावर वाद घालत बसण्यापेक्षा सखोल तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीएम मोदी म्हणाले, संसदेत जो प्रकार घडला त्याकडे गांभीर्याने पहायला हवं. त्यामुळेच लोकसभेचे (Lok Sabha Security) अध्यक्ष अधिक गंभीरपणे पावले उचलत आहेत. तपास यंत्रणाही कसून तपास करत आहेत. या घटनेमागे नेमकं कोण आहे आणि त्यांचे काय मनसूबे आहेत या गोष्टींचा अधिक खोलात जाऊन तपास होण्याची गरज आहे. या विषयावर विरोध आणि वादविवाद होता कामा नयेत असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

Video : बेरोजगारीमुळेच संसदेवर हल्ला; मोठं विधान करत राहुल गांधींनी मोदींवर फोडलं खापर

याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. संसदेत 13 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे मुख्य कारण देशातील बेरोजगारी असून, तरुणांच्या या प्रतिक्रियेनंतर देशात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे दिसून येत आहे. देशातील प्रमुख समस्या बेरोजगारी असून, पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. मोदींच्या धोरणामुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळत नसून लोकसभेच्या सुरक्षेचा भंग होण्याचे मुख्य कारण बेरोजगारीचं हेच आहे. सध्या भारतीय लोकांची सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

हल्ल्यानंतर आठ कर्मचारी निलंबित

दुसरीकडे 13 डिसेंबरला संसदेवर झालेल्या स्मोक अटॅकनंतर सुरक्षेत त्रुटी राहिल्याप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 2001 मध्ये संसदेवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच दिवशी अशाप्रकारची घटना पुन्हा घडणे यामुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पोलीस तपासातून रोज नवनवीन माहिती समो येत आहे. संसदेत घुसखोरी करण्याआधी आरोपींनी आत्मदहन करण्याचा प्लॅन रचला होता. नंतर हा प्लॅन मागे पडला. त्यानंतर संसदेत पॅम्पलेट वाटण्याचाही दुसरा प्लॅन आखण्यात आला होता.  तोही पुढे सोडून देण्यात आला अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.

मोठी बातमी! इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; अवघ्या चार दिवसात केंद्रानं बदलला निर्णय

 

follow us