Download App

“सरदार पटेल त्याचवेळी POK ताब्यात घेणार होते, त्यांचं ऐकलं असतं तर..”, PM मोदींनी सांगितला काँग्रेसचा इतिहास

जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचं ऐकलं असतं तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटनांचा सिलसिला केव्हाच थांबला असता.

PM Narendra Modi Gandhi Nagar Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात (PM Narendra Modi) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधला. दहशतवाद ही पाकिस्तानची (India Pakistan Tension) विचार करून तयार केलेली रणनीती आहे. जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचं ऐकलं असतं तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटनांचा सिलसिला केव्हाच थांबला असता. पीएम मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला खडेबोल सुनावले तसेच विकासाच्या मुद्द्यावरही मोठ्या गोष्टी सांगितल्या.

मोदी म्हणाले, पाकव्याप काश्मीर (Pak Occupied Kashmir) ताब्यात घेण्यासाठी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आग्रही होते. जोपर्यंत पीओके भारताच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवू नये असं पटेलांचं मत होतं. पण त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची एक चांगली संधी आपण गमावली, असे मोदी म्हणाले.

शरीर कितीही स्वस्थ असलं तरी एखादा काटा जरी टोचला तरी संपूर्ण शरीर अस्वस्थ होतं. आता आम्ही ठरवलं आहे की हा काटा कायमचा काढून टाकायचा. मी दोन दिवसांपासून गुजरातेत आहे. काल मी वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबादला गेलो होतो. आज गांधीनगरात आहे. ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं मला लोकांत देशभक्तीचा ज्वार दिसला.

धोकेबाज चीन! पाच दहशतवाद्यांना वाचवले; ‘यूएन’मधील कारवायांचा धक्कादायक अहवाल उघड..

सन 1947 मध्ये भारतमातेचे दोन तुकडे झाले होते. त्यावेळी खरंतर भारतमातेचे साखळदंड तुटायला हवे होते पण तुटल्या भुजा. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री काश्मीरवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. भारतमातेचा एक हिस्सा दहशतवाद्यांच्या, मुजाहिदिनांच्या जोरावर पाकिस्तानने बळकावला. जर त्याच दिवशी या मुजाहिदीन लोकांना मारलं गेलं असतं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सिलसिला दिसलाच नसता.

जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात येत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या बोलण्याकडं कुणीही लक्ष दिलं नाही. आता 75 वर्षांनंतरही आपण दहशतवादाला तोंड देत आहोत. पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला हे त्याचेच उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले.

follow us