Download App

BJP कडून पंतप्रधान मोदींचा ‘टर्मिनेटर’ असा उल्लेख, पोस्टर शेअर करून इंडिया आघाडीवर टीका

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2024 या वर्षात लोकसभा निवडणुकीबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे. या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन विरोधकांना एकजूट करून इंडिया आघाडीची स्थापन केली. या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने (BJP) ट्विटद्वारे विरोधी आघाडीवर टीका केली आहे.

भापजला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी उद्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी अनेक नेते दाखल झालेत. अशात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हॉलिवूडच्या प्रसिद्ध सायन्स फिक्शन फिल्म ‘टर्मिनेटर’शी केली आहे. भाजपनं म्हटलं आहे की, ‘टर्मिनेटर नेहमीच जिंकतो. मोदी 2024 मध्ये परत येणार.

भाजपनं ट्विटरवर पोस्टर शेअर करत म्हटलं की, विरोधकांना वाटतं की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदींना पराभूत करू शकतील. मात्र, विरोधक केवळ स्वप्न पाहत आहेत. त्यांनी खुशाल स्वप्ने पाहावे. पण टर्मिनेटर नेहमी जिंकतो. त्याचप्रमाणे मोदी 2024 मध्ये पुन्हा परततील, अशा आशयाचं ट्विट भाजपने केलं

तत्पूर्वी, अन्य एका पोस्टमध्ये भाजपने विरोधकांवर जोरदार टीका केली. UPA चे लक्ष्य, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे आणि भारताची लूट करणे, अशा आशयाची पोस्ट भाजपने कली. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 26 विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी केली आहे. या आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी पाटणा येथे तर दुसरी बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली. आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.

Tags

follow us