PM Narendra Modi Warn after Waqf Bill pass and Law applicable : वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली (Waqf Amendment Bill 2025) होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Droupadi Murmu) देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता वक्फ संशोधन विधेयक 2025 कायद्यात रुपांतरीत झाले आहे. त्यानंतर आज 8 एप्रिल 2025 ला याबबातचा जीआर लागू करण्यात आला आहे. यावर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचं कायदेशीर महत्व सांगितलं. ते म्हणाले सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे सरकारचं मोठं पाऊल आहे. 2013 मध्ये याबाबतचा कायदा हा जमीन तस्कर आणि मुस्लिम कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी तयार करण्यात आला होता. संसदेत देखील यावर चर्चा करताना तुष्टीकरणाच्या राजकारणाची झलक पाहायला मिळाली.
तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले 1947 ला देशाचा विभाजन झालं. त्यावेळी देखील काँग्रेसच्या काही नेत्यांनी कट्टरपंथी विचारांना प्रोत्साहन दिल. त्यावेळी गरीब आणि सामान्य मुस्लिम समाज त्यासाठी सहमत नव्हता. तरी देखील कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी महिलांच्या सार्वजनिक अधिकारांचा बळी देण्यात आला.
जगाला झटका देणाऱ्या ट्रम्पकडून दिलासा! ब्राझीलसह ‘या’ देशांवरील टॅरिफ घेतला मागे
तसेच काँग्रेसने 2013 साली बनवलेला वक्फ कायदा हा संविधानापेक्षा उच्च असल्याचं दाखवून दिले गेले. मात्र आता मुस्लिम समाजाच्या हिताच्या दृष्टीने नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा तयार करण्यात झालेली संसदेतील चर्चा ही इतिहासातील दुसरी सर्वात मोठी चर्चा ठरली आहे. तर दुसरीकडे सरकारने पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळामध्ये नवीन सुधारणाची दार उघडले आहेत. त्यामुळे आता भारत झुकणारही नाही आणि थांबणारही नाही. गतिशील विकासासाठी शांती स्थिरता आणि सुरक्षितता अत्यंत गरजेचे आहे.