Download App

नरेंद्र मोदींचं तिसरं मंत्रिमंडळ; भाजपाचाच वरचष्मा, वाचा A टू Z मंत्री अन् त्यांची खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi New Cabinet : नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या एकूण 71 खासदारांनी पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या भाजप भाजप खासदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या संख्येवर सध्या मोठी जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्र्यांची एकूण संख्या, त्यातील पक्षनिहाय मंत्रीपदांचं वाटप, भाजपा-जदयू-टीडीपीमध्ये झालेलं बहुतेक मंत्रीपदांचं वाटप या मुद्द्यांवर चर्चा आहे. कारण एकूण 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री एकट्या भाजपाचेच आहेत.

तर्क-वितर्क

लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. यंदा एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ मिळवण्यात आपयश आलेलं आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच पुढची 5 वर्षं मोदी सरकारचा कारभार चालणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाला किती महत्त्व दिलं जातं, यावर तर्क-वितर्क लावले जात होते. यासंदर्भात आता पहिल्या शपथविधीतील मंत्र्यांची सविस्तर यादी समोर आली असून, त्यातून हे गणित स्पष्ट झालं आहे.

भाजपाचाच वरचष्मा

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर एकूण ३० खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामधील २५ एकट्या भाजपाचेच होते. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, लोजप, एचएएम आणि टीडीपी या पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्याखालोखाल ३६ खासदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातही भाजपाचाच वरचष्मा राहिला असून पक्षाच्या ३२ खासदारांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे. त्याशिवाय रामदास आठवलेंच्या रुपात रिपाइंला १, जदयूला २ तर टीडीपीला १ राज्यमंत्रीपद मिळालं आहे.

राज्यमंत्री स्वतंत्र पदभार

याशिवाय, जे पद महाराष्ट्रात अजित पवार गटाला देण्यात आलं होतं आणि जे त्यांनी नाकारलं, त्या राज्यमंत्री पद स्वतंत्र पदभारसाठी अवघ्या पाच खासदारांनी शपथ घेतली. त्यातही भाजपाचे तीन खासदार, शिंदे गटाचा एक तर रालोदच्या एका खासदाराचा समावेश आहे.

 

पक्षनिहाय मंत्रीपदांचं वाटप
एकूण मंत्रीपदं – ७१

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यनिहाय मिळालेली मंत्रीपदं

follow us