बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार, नरेंद्र मोदी, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणे आणखी एक नाव चर्चेत होत, ते म्हणजे प्रशांत किशोर. पीके म्हणून ते प्रसिद्ध आहेत. भारतातील यशस्वी राजकीय रणनितीकार अशी त्यांची ओळख आहे. प्रशांत किशोर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जन सुराज नावाचा पक्ष स्थापन केली. त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळताना दिसत नाही.
जन सुराज पार्टीने सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्यांच्या काही उमेदवारांनी निवडणुकीच मैदान सोडलं. त्यामुळे त्यांनी 240 जागांवर निवडणूक लढवली. आज बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आहेत. मतदारांनी त्यांच्या नव्या पक्षाला नाकारल्याच दिसत आहे. प्रशात किशोर यांची बिहार निवडणुकीत पिछेहाट का झाली? ते पाच पॉइंटमधून समजून घेऊया.
काय घडलं?
बिहारमधील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण आहे. जन सुराज पार्टी अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकलेली नाही. ग्रामीण मतदारांना जन सुराज पार्टीच निवडणूक चिन्ह आणि उमेदवार माहित नव्हते. त्यामुळे तळागाळातील मत त्यांना मिळाली नाहीत. प्रशांत किशोर यांनी बिहार पिंजून काढला. पण त्यांना अजून बरच काम करावं लागेल असं सध्यातरी दिसत आहे.
जन सुराजने पारंपारिक पक्षांच्या रचनेऐवजी चेहरा ब्रांडिंग म्हणजे प्रशांत किशोर आणि पेड वर्करच्या नेटवर्कवर भर दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसला. अनेक अनुभवी आणि संस्थापक कार्यकर्त्यांना तिकीटं मिळाली नाहीत. पॅराशूट लँडिंग म्हणजे अचानक प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना तिकीटं मिळाली. तिकीट न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याला प्रशांत किशोर यांनी कुटुंबातला विषय असल्याच म्हटलं. माजी आयपीएस आनंद मिश्रा सारख्या लोकांनी पार्ची सोडली. त्यातून अंतर्गत मुद्दे आणि धुसफूस स्पष्ट होते.
