मोठी बातमी : मोदी-शाहंकडून पोर्ट ब्लेअरचे नामकरण; ‘श्री विजया पुरम’ म्हणून ओळखले जाणार

पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Martha Reservation मध्ये तूर्तास हस्तक्षेप टाळत; केंद्राने अंग काढून घेतले?

Martha Reservation

Port Blair renamed As Sri Vijaya Puram : अंदमान-निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, आता पोर्ट ब्लेअर ‘श्री विजया पुरम’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. खुद्द गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ही माहिती दिली आहे.

नाथाभाऊ, ‘हा’ देवेंद्र फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

आम्ही पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये शाह यांनी ही माहिती दिली आहे. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजया पुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शाहंनी म्हटले आहे.

अमित शाहंची पोस्ट नेमकी काय?

श्री विजया पुरम हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे शाहंनी म्हटले आहे.

Pranali Barad : लाडकी बहिण खरंच स्वावलंबी बनली! थोडंस् डोकं लावलं अन् दीड हजारांत दहा हजार कमवले…

नेताजी सुभाषचंद्र बोसजी यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये केलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंतचे ठिकाणही हे बेट असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

Exit mobile version