Prajwal Revanna : देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाचे नेते आपल्या प्रचारात गुंतलेले आहेत. जोरदार प्रचार सुरू असताना कर्नाटकमधून एक गंभीर बातमी समोर आली. जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हे सेक्स स्कँडल प्रकरणात सापडले आहेत. 2972 व्हिडो क्लिप असलेला पेन ड्राईव्ह या प्रकरणात समोर आला आहे. दरम्यान, ही घटना उघड होताच प्रज्वल रेवण्णा जर्मनीला फरार झाले आहेत. आता त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ವಿಚಾರಣೆಗೆ ಹಾಜರಾಗಲು ನಾನು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ, ನಾನು ನನ್ನ ವಕೀಲರ ಮೂಲಕ C.I.D ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೇನೆ.
ಸತ್ಯ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಹೊರಬರಲಿದೆ.
As I am not in Bangalore to attend the enquiry, I have communicated to C.I.D Bangalore through my Advocate. Truth will prevail soon. pic.twitter.com/lyU7YUoJem
— Prajwal Revanna (@iPrajwalRevanna) May 1, 2024
काय म्हणाले आहेत प्रज्वल रेवण्णा?
त्यांनी एस्क (ट्विटर)वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ‘Truth will prevail soon” म्हणजेच ‘सत्य लवकरच सगळ्यांना समजेल’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. तसं, मी बंगळुरुमध्ये नाही. त्यामुळे जी काही चौकशी आहे त्यासाठी कसं सामोर जाणार? असा प्रश्न करत त्यांनी माझ्या वकिलामार्फत सीआयडीशी संपर्क साधला आहे असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहलं आहे.
प्रज्वन्ना हे जर्मनीला फरार
या सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटी स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रेवण्णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्णांना नोटीस देण्यात आली आहे. तसंच, चोकशीसाठी आपण उपस्थित राहावं असंही यामध्ये सांगण्यातं आलं आहे. दरम्यान, प्रज्वन्ना हे जर्मनीला फरार झाले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर कर्नाटक राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे.
काय आहे प्रकरण
२०२४ मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेवे आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात 2976 अश्लील व्हिडीओ आहेत. यामध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा त्यांचा दावा आहे.