Jalgaon : पेन ड्राईव्ह प्रकरणात गाजलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक

  • Written By: Published:
Jalgaon : पेन ड्राईव्ह प्रकरणात गाजलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उघडकीस आणलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणात समोर आलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण (praveen chavan) यांना आज अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलीस स्थानक मध्ये आपल्या एका प्रकरणात हजेरी लावण्यासाठी आलेले प्रवीण चव्हाण याना तक्रारदार निलेश भोइटे यांच्या घरावर पोलिसांसमोर दरोडा टाकल्याचा गुन्ह्यात मध्ये अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवीण चव्हाण हा दरोडा पुण्यात बसून ऑपरेट करत असल्याचे तक्रारीत म्हटल आहे.

या तक्रारी प्रमाणे निलेश भोईटे आणि सुनील झवर यांच्या घराची झडती घेण्यासाठी दि १ जानेवारी २०२२ रोजी पुणे पोलीसांचे ३२ जण अधिक जळगाव शहराचे १० पोलीस यांनी निलेश भोईटे यांच्या घरात कुलुप तोडून प्रवेश केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर तब्बल एक वर्ष नी हा गुन्हा दाखल झाला आहे.

याच प्रकरणात सुरवातीला ऍड. विजय पाटील आणि किरण साळुंखे हे दोन आरोपी करण्यात आले होते. या गुन्ह्यात दोन्ही आरोपी कोर्टाने जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणत प्रवीण चव्हाण यांच्या सह अजुन पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. हा दरोडा टाकत असताना प्रवीण चव्हाण हे पुण्यात बसून ऑपरेट करत होते असा आरोपाखाली त्याना आज रात्री अटक करण्यात आली.

हेही वाचा : Sharad Pawar यांना अनिश्चित परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याचा अनुभव

कोण आहेत प्रवीण चव्हाण ?

प्रवीण चव्हाण हे गेले १२ वर्ष विशेष सरकारी वकील म्हणून काम करत आहेत.  जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध घरकुल घोटाळ्यात विशेष सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होत. या खटल्यात सुरेश जैन यांच्यासह चार माजी आमदार आणि ५० नगरसेवकांना शिक्षा झाली होती.

याशिवाय डी एस कुलकर्णी खटला, शिवाजीराव भोसले बँक घोटाळा, आमदार रमेश कदम यांचा अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा, रवींद्र बराटे बराटे प्रकरण, नागपूरातील कुख्यात गुंड मोका प्रकरण, जळगावमध्ये गाजत असलेल्या रायसोनी पतसंस्था घोटाळा अशा मोठ्या २० प्रकरणात विशेष सरकारी वकील राहिले आहेत. शिंदे फडणवीस सरकार येताच प्रवीण चव्हाण याना सर्व खटल्यातून वगळण्याचा निर्णय एकच दिवशी घेण्यात आला.

विधानसभेत गाजलं होत पेन ड्राईव्ह प्रकरण

गिरीश महाजन आणि त्यांचे सहकारी रमेश नाईक यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी प्रवीण चव्हाण कसा सापळा रचत आहेत. याचं रेकॉर्डिंग आधी आमदार मंगेश चव्हाण त्यांनतर गिरीश महाजन त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांना कसं अटक करता येईल? अशा प्रवीण चव्हाण यांच्या आवाजातील व्हिडिओ रिकॉर्डिंग तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले होते. महाविकासआघाडी सरकार मला अटक करण्यासाठी खोटे गुन्हे तयार करत आहे, असा मोठा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

त्या नंतर विधानसभेत उत्तर देताना तत्कालीन गॄहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी या प्रकरणाची दखल घेत प्रवीण चव्हाण यांना या गुन्ह्यातून बाजुला केले होते. या घटनेनंतर आठ महिन्यांनी आज प्रवीन चव्हाण याना दरोड्याच्या गुन्हात अटक झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube