देशात सध्या भाजपच्या पराभवासाठी सर्वच विरोधी पक्षांकडून कंबर कसल्याचं चित्र दिसतंय. अशातच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक मोठं विधान केलंय. विरोधी पक्षांना प्रशांत किशोर यांनी एक सल्ला दिला आहे. भाजपाला हरवणं शक्य कधी होणार याबाबत प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलंय.
भारतीय दूतावासांच्या हल्ल्यानंतर खलिस्तानी समर्थकांच्या ट्विटरवर कारवाई
प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद, त्यांची बलस्थानं काय आहेत? हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजून घ्यायला हवा, असा सल्ला किशोर यांनी दिला आहे.
तसेच भाजपाला चॅलेंज द्यायचं असेल तर कुठल्याही विरोधकाला या तीन गोष्टी विचारात घेऊन त्यांना चॅलेंज द्यावं लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Old Pension Scheme : संप मागे पण… महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला ‘हा’ आरोप
हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक असून गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणी या कामात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचंही किशोर यांनी सांगितलंय.
या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाहीत. त्या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
अहमदनगरच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन… पहा आमदार जगताप काय म्हणाले
सध्या पाहतोय विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतंय कुणी कुणासोबत चहा घेतंय. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडणार असल्याचं ते म्हणाले आहेत. एकत्र जेवण करणं आणि चहा पिणं ही भाजपाला हरवण्याची पद्धत नसल्याचं ते म्हणालेत.
दरम्यान, किशोर यांच्या नावे २०१४ च्या निवडणुकांमध्ये अनेक विजय असून प्रशांत किशोर सध्या जन सुराज यात्रेत बिहारचा दौरा करत आहेत.