अहमदनगरच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन… पहा आमदार जगताप काय म्हणाले

अहमदनगरच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन… पहा आमदार जगताप काय म्हणाले

अहमदनगर : राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता अहमदनगर शहराच्या नामांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र जिल्ह्याच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन (District Division) होणे गरजचे आहे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केली आहे. जगताप यांच्या या मागणीमुळे आता यावर प्रशासकीय पातळीवर काही हालचाली होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान प्रशासनाचे कामकाज अधिक गतीने होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, या हेतूने राज्यात काही ठिकाणी जिल्हा विभाजन करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. या मागे त्या परिसरातील जनमताचा रेटाही होताच. तसेच सध्या अहमदनगर जिल्ह्यात नामंतराचा विषय चर्चेला जात आहे.

मात्र, त्याआधी जिल्हा विभाजन हाेण्याची गरज आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी या मुद्दयावर भाष्य केल्याने जिल्हा विभाजनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्याचे स्पष्ट हाेत आहे. जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शहरातील माउली सभागृहात आयोजित सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मस्थान हे अहमदनगर जिल्ह्यातच आहे. त्यामुळं नामांतराचा मुद्दा सर्वांच्या मनात आहे. जिल्हा विभाजनानंतर पुढे जाऊन तीच सर्वांची भूमिका राहणार आहे. दरम्यान यापूर्वी नगर जिल्ह्याच्या विभाजनाला खासदार सुजय विखे यांनी विरोध दर्शविला होता. मात्र आमदार जगताप यांनी विभाजनाच्या मुद्द्याला यापूर्वी देखील समर्थन दिले होते.

बायकोला पेन्शन मिळाल्याचा भलताच आनंद, नवऱ्याने थेट तिला…

जिल्ह्याचे विकासाचे दृष्टीने जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी यापूर्वी आमदार जगताप यांनी केली होती. जिल्हा विभाजन झाल्यास नगर दक्षिण भागाचा विकास करता येईल. प्रगल्भ उत्तर भागामुळे दक्षिण भाग दुष्काळग्रस्त राहत असल्याची खंत जगताप यांनी व्यक्त केली होती.

फडणवीस म्हणाले…आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही

दरम्यान जिल्हा विभाजनाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी अनेकदा आंदोलने देखील झाली. यावर राजकीय नेते मंडळींनी आश्वासने देखील दिली होती, मात्र ही आश्वासने हवेतच विरली. दरम्यान आता पुन्हा एकदा आमदार संग्राम जगताप यांनी या मुद्द्यावरून भाष्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात यावर काही हालचाली होतात का? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube