Maha Kumbh Stampede : मौनी अमावस्येच्या शाही स्नाना दरम्यान प्रयागराजमधील (Prayagraj) संगम तटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक भाविक जखमी झाले आहेत. महाकुंभात अभूतपूर्व अशी गर्दी झाली आहे. त्यामुळे या गर्दीचं नियोजन करताना प्रशासनाची पुरती दमछाक झाली आहे. वाढत्या गर्दचा दबाव सहन करणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. यातूनच मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आज पहाटे शाही स्नान होणार होते. त्याच आधी चेंगराचेंगरीची घटना घडली. ही घटना नेमकी कशी झाली याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh: Rescue operations are underway after a stampede-like situation arose in Maha Kumbh and several people were reported injured. https://t.co/4z63F7pAS9 pic.twitter.com/YxZHXIoy51
— ANI (@ANI) January 29, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2 वाजता संगम तटावर प्रचंड गर्दी झाली होती. याच दरम्यान बॅरेकेडिंगचा एक भाग तुटला आणि एकच धावपळ उडाली. पाहता पाहता स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. लोक वाट दिसेल तिकडे सैरावैरा पळत सुटले. याच पळापळीत अनेकांच्या वस्तू पडल्या. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की आम्ही आरामात चाललो होतो. तेव्हा अचानक गर्दी दिसू लागली. धक्का बुक्की सुरू झाली. आम्ही स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच जागा नव्हती. याच चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले. अशी परिस्थिती होती की काय होतंय हेच कळत नव्हतं.
#WATCH | #Mahakumbh | Prayagraj, Uttar Pradesh: On the reports of a stampede at the Maha Kumbh, Special Executive Officer Akanksha Rana says, “On the Sangam routes, a stampede-like situation arose after some barriers broke. Some people have been injured. They are under treatment.… pic.twitter.com/SgLRVXMlgf
— ANI (@ANI) January 28, 2025
घटनेची माहिती मिळताच पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स आणि फायर ब्रिगेडची पथके घटना स्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे ऑल टेरेन वाहन आधीच येथे हजर होते. त्यामुळे जखमींना तत्काळ बाहेर काढण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी भपतेंदु जोशी यांनी सांगितले की घटनेच्या वेळी वाहन येथे हजर होते. यामुळे मदतकार्याला वेग आला. एका लहान मुलीला या वाहनातून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.
#MahaKumbh2025 | PM Modi spoke to UP CM Yogi Adityanath about the situation at the Maha Kumbh Mela, reviewed the developments, and called for immediate support measures. pic.twitter.com/T5mQCQM7M0
— ANI (@ANI) January 29, 2025
मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाने या गर्दीच्या नियंत्रणासाठी बॅरेकेडिंग केले होते. परंतु, गर्दीच इतकी जास्त होती की हा उपाय देखील कुचकामी ठरला. सिव्हील डिफेन्स आणि पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांनी बॅरिकेड पकडून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु, लोकांची संख्या इतकी जास्त होती की काहीच करता आले नाही.