Download App

स्वदेशी युद्धनौका ‘विंध्यगिरी’चे उद्या उद्घाटन, नौदल आणखी होणार मजबूत

Vindhyagiri : भारतीय नौदलासाठी प्रकल्प 17A अंतर्गत बांधण्यात आलेली स्वदेशी युद्धनौका’विंध्यगिरी’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (गुरुवारी) लाँच करणार आहेत. युद्धनौकेचा लोकार्पण सोहळा कोलकाता शहरातील हुगळी नदीच्या काठावर असलेल्या GRSE च्या जहाजबांधणी सुविधेत होणार आहे.

‘विंध्यगिरी’ जहाजात अत्याधुनिक उपकरणे बसवली जाणार आहेत आणि भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यापूर्वी त्याच्या व्यापक चाचण्या घेण्यात येणार आहेत. पूर्वीच्या ‘विंध्यगिरी’ने 08 जुलै 1981 ते 11 जून 2012 या कालावधीत आपल्या 31 वर्षांच्या सेवेत अनेक आव्हानात्मक मोहिमांमध्ये आणि बहुराष्ट्रीय सरावांमध्ये भाग घेतला होता.

‘वंदे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक, 3 महिन्यांत 4 दगडफेकीच्या घटना

नव्याने बांधलेली ‘विंध्यगिरी’ देशाच्या समृद्ध नौदल इतिहास तसेच भविष्यातील स्वदेशी संरक्षण क्षमतेला प्रेरणा देण्याचे प्रतीक आहे. प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत M/s MDL द्वारे एकूण चार जहाजे आणि M/s GRSE द्वारे तीन जहाजांचे बांधकाम सुरू आहे. 2019-2022 दरम्यान MDL आणि GRSE द्वारे प्रकल्पाची पहिली पाच जहाजे लाँच करण्यात आली होती.

Rahul Gandhi : लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती

स्वदेशी डिझाइन केलेले
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाचे जहाज भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने स्वदेशी डिझाइन केले आहे. आत्मनिर्भर भारताच्या कार्यक्रमानुसार, प्रकल्प 17A जहाजांवर उपकरणे आणि यंत्रणांसाठी 75 टक्के ऑर्डर स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. विंध्यगिरीचे लाँचिंग भारताने स्वावलंबी नौदल निर्माण करण्याच्या दिशेने केलेल्या अतुलनीय प्रगतीची साक्ष आहे, असा नौदलाचा विश्वास आहे. ही युद्धनौका नौदलात सामील झाल्यानंतर तिची ताकद लक्षणीय वाढणार आहे.

Tags

follow us