कॅन्सर औषधांच्या किमती 70% पर्यंत कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Cancer Drugs :  देशात वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधे 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याचा

Cancer Drugs

Cancer Drugs

Cancer Drugs :  देशात वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधे 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सर्व ‘नॉन-शेड्युल्ड’ कर्करोगविरोधी औषधांवरील ‘ट्रेड मार्जिन’ (व्यापारी नफा) जास्तीत जास्त 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधांवरील अति-नफा रोखणे आणि जीवनावश्यक औषधे सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

माहितीनुसार, ट्रेड मार्जिन 30 टक्क्यांवर (Non-scheduled anti-cancer drugs) मर्यादित केल्यामुळे या औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) 70 टक्क्यांपर्यंत मोठी घट होण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांचा उपचारांवरील स्वतःच्या खिशातून होणारा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे रुग्णांची वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपयांची थेट बचत होईल, असा अंदाज आहे.

सर्व प्रकारच्या औषधांचा समावेश 

सरकारचा हा निर्णय कर्करोगावरील औषधांच्या सर्व श्रेणींना लागू होतो. औषध ब्रँडेड असो वा जेनेरिक, देशांतर्गत उत्पादित असो वा आयात केलेले, पेटंट असलेले असो वा नसलेले. हा नियम सर्व ‘नॉन-शेड्युल्ड’ कर्करोगविरोधी औषधांना लागू होईल. यामुळे किमती कमी होऊनही, या जीवनावश्यक औषधांचा बाजारातील पुरवठा अबाधित राहील याची खात्री केली गेली आहे.

कॅनेडियन कवयित्री ॲन कार्सन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर-

2019 च्या निर्णयाची पुढील पायरी

हे पाऊल 2019 मध्ये घेतलेल्या निर्णयाची पुढची पायरी आहे. त्यावेळी 526 ब्रँड्ससाठी अशीच यंत्रणा लागू करण्यात आली होती. त्या वेळी रुग्णांची वार्षिक सुमारे 984 कोटी रुपयांची बचत झाली होती.

Exit mobile version