देशात आर्थिक वादळ पण पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटण्यात व्यस्त ; राहुल गांधी PM मोदींवर भडकले

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी

Rahul Gandhi On PM Modi

Rahul Gandhi On PM Modi

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट्स गिफ्ट म्हणून दिलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशात दररोज महागाईत वाढ होताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणावरुन आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. रायबरेली येथे एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकांना परदेश प्रवास करू नका, सोने खरेदी करू नका आणि त्याऐवजी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करा, असे सांगतात. नजीकच्या काळात शेतकऱ्यांना खत मिळणे कठीण होईल. येत्या काही महिन्यांत महागाईचा भडका किती उडतो ते फक्त पहा. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस, डाळी आणि तांदूळ यांच्या किमती किती गगनाला भिडणार आहे. पंतप्रधान लोकांना सोने खरेदी करू नका आणि परदेश प्रवास करू नका असे सांगतात तरीही ते स्वतः मात्र हजारो कोटी रुपयांच्या विमानांतून परदेश दौरे करतात असं या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले.

तर एक्सवर राहुल गांधी यांनी पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपल्यावर आर्थिक संकट (वादळ) घोंगावत आहे, तरीही आमचे पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. शेतकरी, तरुण, महिला, कामगार आणि छोटे व्यापारी प्रत्येकजण संकटात आहे आणि अशा वेळी पंतप्रधान मात्र हसतमुख चेहऱ्याने सोशल मीडियासाठी ‘रील्स’ बनवत आहेत, तर भाजपचे सदस्य टाळ्या वाजवत आहेत असं या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले.

मराठी भाषा वादावर नितीन गडकरींचे मौनभंग; शेखर सुमन यांना म्हणाले, “तुम्हीही बिहारी आहात!”

Exit mobile version