Download App

काँग्रेसने दारुत भ्रष्टाचार केला, गायीचे शेणही सोडले नाही… : PM मोदींचा हल्लाबोल

बिलासपूर : ‘छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये भ्रष्टाचार केला, दारूमध्ये भ्रष्टाचार केला, काँग्रेसने गायीचे शेणही सोडले नाही’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) टीका केली. ते शनिवारी (30 सप्टेंबर) आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिलासपूरमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक स्थानिक मुद्द्यांवरुन भूपेश बघेल सरकारवर हल्लाबोल केला आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिवाय महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. (Prime Minister Narendra Modi attacked on Congress in a public meeting held in Bilaspur ahead of upcoming Chhattisgarh assembly elections)

पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या देशवासियांनो, मोदींनी तुम्हाला दिलेली आणखी एक हमी पूर्ण केली आहे. आता लोकसभा आणि विधानसभेच्या 33 टक्के जागा बहिणींसाठी राखीव असतील. नारी शक्ती वंदन कायदा आता भाजप सरकारच्या काळात प्रत्यक्षात आला आहे. कालच आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर स्वाक्षरी करून कायदा केला आहे. मोदी जी हमी देतात त्याची पूर्तता करतात, पण तुम्ही विशेषत: माता-भगिनींनो, खूप सावध राहावे लागेल.

MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !

मोठ्या कष्टाने आम्ही एवढा मोठा टप्पा पार केला आहे. 30 वर्षे विधेयक प्रलंबित होते, 30 वर्षांची कल्पना करा. किती सरकारं आली, बोलत राहिली, ढोंग करत राहिले, पण काम झाले नाही. काँग्रेस आणि त्यांच्या गर्विष्ठ मित्रपक्षांना मोदींनी काय केले, असे त्यांना वाटते, त्यांना राग आहे, या सर्व माता-भगिनी आता मोदींनाच आशीर्वाद देतील, असे त्यांना वाटते, त्यांची झोप उडाली आहे. भीतीमुळे ते आता नवनवीन खेळ खेळू लागले आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का, त्यांची इच्छा नसतानाही त्यांना संसदेत पाठिंबा का द्यावा लागला? माता-भगिनींनो, तुमच्या एकजुटीची त्यांना भीती वाटत होती, त्यामुळेच त्यांना आज तुमच्या पायाशी यावे लागले आहे, पण आता त्यांनी नवा खेळ सुरू केला आहे. आता त्यांना माता-भगिनींमध्ये फूट पाडायची आहे, त्यांना वाटते की तुम्ही संघटित झाला तर त्यांचा खेळ पूर्ण होईल”

ISKCON वर केलेले आरोप मनेका गांधींना भोवणार? इस्कॉनकडून 100 कोटींचा दावा…

“मला छत्तीसगडच्या माता आणि भगिनींना सांगायचे आहे की हा एक असा निर्णय आहे ज्याचा पुढील हजारो वर्षे प्रभाव पडेल, प्रत्येक कुटुंबातील माता आणि भगिनींना नवीन शक्ती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम केले आहे. माझ्या माता-भगिनींनो, या लबाडांच्या भानगडीत पडू नका, ते तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची एकजूट कायम राहावी, तुमचे आशीर्वाद कायम राहावेत, तुमची स्वप्ने या मोदींच्या हातून पूर्ण होतील, असे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले.

Tags

follow us