विरोधक जवळ येतील पण सोबत येणार नाहीत, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. देशातल्या भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बंगळुरुमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील एकूण 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर विरोधकांनी भाजपला टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधकांच्या बैठकीवर बोट ठेवत फैलावर घेतलं आहे.
Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ माहिती…
पंतप्रधान म्हणाले, प्रत्येक विचारधारेचा उद्देश एकच असतो, चांगल सरकार आणि देशाची सेवा करणं पण विरोधकांकडून आमच्यावर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. राजकारणात प्रतिस्पर्धा असते पण शत्रूता नसते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच विरोधक लोकांना तोडत आहेत पण आम्ही जोडतो. देशाला तोडण्याचं काम विरोधकांकडून सुरु आहे. विरोधकांचे कारनामे देशाची जनता डोळ्याने पाहत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
नेशन फर्स्ट हेच एनडीएचं धोरण, कोणी कितीही आघाड्या केल्या तरी….; PM मोदींचा विरोधकांना टोला
विरोधक स्वार्थासाठी तत्वांशी तडजोड करीत आहेत. या सर्व गोष्टी जनता डोळ्याने बघत आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारसरणीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ले सुरु आहेत. पण टीएमसीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाहीत, विरोधकांची हकीकत आत जनतेच्या लक्षात आलीय, त्यामुळे विरोधक जवजवळ येऊ शकतात पण सोबत नाही येऊ शकत नसल्याचं भाकीत मोदींनी केलं आहे.
https://letsupp.com/mumbai/chandrakant-patil-spoke-on-mumbai-hostel-rape-case-and-made-some-important-decisions-69194.html
जे लोकं मोदींना हरवण्यासाठी एवढा वेळ घालवत आहेत जर गरीबांसाठी काम केलं असतं तर ही वेळ आली नसते. आम्ही कोरोना काळात कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा हे पाहिलं नाही लोकांसाठी अहोरात्र काम केलं. देशातल्या सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन चर्चा केली.
दरम्यान, एनडीए सरकारने विरोधकांचाही सन्मान केला आहे. देशातील नेते मुलायम सिंह यादव, शरद पवार, गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार दिला आहे, हे नेते भाजपचे नव्हते तरीही आम्ही त्यांचा गौरव केला असल्याचं मोदींनी स्पष्ट केलंय.
केवळ सत्ता मिळवणे एनडीएचा उद्देश नाही. एनडीए कोणाच्या विरोधात किंवा कोणाला सत्तेपासून दूर करण्यासाठी नाही. केवळ स्थिरता आणण्यासाठी एनडीएची निर्मिती झाली होती. देशात स्थिर सरकार असेल तर देशात असे निर्णय घेता येतात. त्यामधून देशाची दिशा बदलता येते. आम्ही कधीही लोकभावनेचा अनादर केला नाही. देश सर्वांच्या प्रयत्नाने चालतो, असंही मोदी म्हणाले आहेत.