नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaj Shareef) यांच्या नातीच्या लग्नाला कसे पोहचले होते? या प्रश्नाचे उत्तर अखेरीस देशाला मिळाले आहे. आज (9 फेब्रुवारी) दुपारच्यावेळी संसदेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करताना याबाबतचा किस्सा उपस्थित आठ खासदारांसह सर्वांना सांगितला. (Prime Minister Narendra Modi had lunch with MPs in the Parliament canteen today)
Enjoyed a sumptuous lunch, made even better thanks to the company of Parliamentary colleagues from various parties and different parts of India. pic.twitter.com/6MWTOCDnPJ
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत जेवण केले. यावेळी भाजप खासदार हीना गावित, एस. फांगनॉन कोन्याक, तेलगु देसम पक्षाचे खासदार राममोहन नायडू, बसपा खासदार रितेश पांडे, बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा आणि एनके प्रेमचंद्रन असे आठ खासदार उपस्थित होते.
यावेळली एका खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याच्या प्रसंगाबद्दल विचारणा केली, यावर त्यांनी सांगितले की, एसपीजीने पाकिस्तानला भेट देण्यास मनाई केली होती. तरी, आपण जाण्याचे ठरविले होते. मी दोन वाजेपर्यंत संसदेत उपस्थित होतो आणि त्यानंतर तिथून थेट अफगाणिस्तानला रवाना झालो. अफगाणिस्तानमधील कार्यक्रम आटोपून आम्ही परत येत असताना फ्लाइटमध्येच पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला,
त्यादिवशी नवाझ शरीफ यांच्या नातीचे लग्न होते. मी नवाज शरीफ यांना पाकिस्तानला भेट देण्याच्या इच्छेबद्दल फोन केला. त्यांना विचारले की ते त्यांच्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनला आले तर त्यांना काही आक्षेप आहे का? ते विमानतळावर त्यांना रिसिव्ह करायला येऊ शकतात का? त्यावर शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना फोनवर सांगितले की होय, मी तयार आहे. त्यानंतर शरीफ पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. मात्र, नंतर यावर बरेच राजकारण झाले आणि पंतप्रधान मोदी हे सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर राहिले.