Download App

PM मोदींचा जगभरात डंका : लोकप्रियतेत पुन्हा ठरले अव्वल, बायडेन, मेलोनी आसपासही नाहीत!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार मोदी यांना सलग चौथ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. या सर्वेक्षणात त्यांना 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. तर त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  (Joe Biden) लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. या यादीत भारतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा टॉप 10 मध्येही नंबर लागलेला नाही. या उलट त्यांना 52 टक्के लोकांनी नापसंती दर्शविली आहे.

यापूर्वी सप्टेंबर आणि एप्रिलमधील सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना 76 टक्के रेटिंग मिळाले होते. तर फेब्रुवारीमध्ये 78 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. पंतप्रधान मोदी यांना केवळ 18% लोकांनी नापसंती दर्शवली. केवळ सहा टक्के लोकांनी त्यांचे मत तटस्थ असल्याचे सांगितले आहे. (Prime Minister Narendra Modi has once again emerged as the world’s most popular leader, according to Morning Consult’s survey.)

Iraq University Fire : इराकमध्ये वसतिगृहाला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू

काय आहे आकडेवारीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. या सर्वेक्षणात त्यांना 76 टक्के रेटिंग मिळाले आहे. 

मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 66% रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

58 टक्के रेटिंगसह स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बर्सेट तिसऱ्या स्थानावर आहेत.

ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा 49% रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत.

त्याच वेळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 40% रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत.

नापसंत नेत्यांच्या यादीत जस्टिन ट्रूडो अव्वल :

द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणामध्ये, नापसंत नेत्यांच्या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अव्वलस्थानी आहेत. त्यांना 58% नापसंती रेटिंग मिळाली आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरची झालेली हत्या आणि त्यानंतर भारतासोबत झालेले राजनैतिक मतभेद या गोष्टींचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 52% नापसंती रेटिंग मिळाली.

कर चुकवल्याप्रकरणी जो बायडेन यांचा मुलगा हंटर अडचणीत; विरोधकांनी चांगलच घेरलं

द मॉर्निंग कन्सल्ट काय आहे?

द मॉर्निंग कन्सल्ट ही एक अमेरिकन कंपनी आहे. जागतिक स्तरावर डेटा इंटेलिजन्सचे काम ही कंपनी करते. 2014 साली मायकेल रेमलेट यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कंपनीची स्थापना केली होती. त्याच वर्षी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते. व्यावसायिक कंपन्यांचा हिशेब ठेवणाऱ्या Deloitte च्या मते, द मॉर्निंग कन्सल्ट ही 2018 आणि 2019 मधील सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान आधारित कंपनी आहे. कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये 22 जागतिक नेत्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणासाठी 6-12 सप्टेंबर 2023 पर्यंत डेटा गोळा करण्यात आला.

follow us